सणसवाडीत दोन गावठी पिस्तुल सह युवक जेरबंद पोलिसांच्या कारवाईत २ पिस्तुल, ८ काडतुसे व कार जप्त

9 Star News
0

 सणसवाडीत दोन गावठी पिस्तुल सह युवक जेरबंद 

पोलिसांच्या कारवाईत २ पिस्तुल, ८ काडतुसे व कार जप्त

शिरूर 
(  प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथे कारमधून दोन गावठी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या युवकाला दोन गावठी पिस्तुल, आठ जिवंत काडतुसे, चार मेगझिन व कार सह शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले असून संकेत पांडुरंग तांबिले (वय २६ वर्षे रा. सराटे वस्ती सणसवाडी ता. शिरुर)असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
                       सणसवाडी ता. शिरुर येथील सराटे वस्ती येथे एक युवक शेवरोलेट क्रुज कारमध्ये दोन गावठी पिस्तुल ठेवून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली, त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, विकास पाटील, रोहिदास पारखे, जयराज देवकर, अमोल नलगे, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, नारायण वाळके यांनी सणसवाडी येथील सराटे वस्ती जात पाहणी केली असता त्यांना एक शेवरोलेट क्रुज कार दिसून आल्याने पोलिसांनी सदर कारचालक युवकाला अडवून कारची झडती घेतली असता कारमध्ये दोन गावठी पिस्तुल त्याचे सोबत आठ जिवंत काडतुसे, चार मेगझिन मिळून आल्याने पोलिसांनी सदर कार व पिस्तुल सह युवकाला ताब्यात घेतले, याबाबत पोलीस हवालदार श्रीमंत सर्जेराव होनमाने यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी संकेत पांडुरंग तांबिले वय २६ वर्षे रा. सराटे वस्ती सणसवाडी ता. शिरुर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहे.
स्वतंत्र चौकट – 
शिक्रापूर पोलिसांच्या पथकाचे दमदार कामगिरी करत दोन गावठी पिस्तुल व आठ जिवंत काडतूस सह युवकाला जेरबंद करण्याची कामगिरी केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी पोलिसांच्या पथकाचे भेट देऊन अभिनंदन केले आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर पोलिसांच्या पथकाने पिस्तुलांसह जेरबंद केलेला आरोपी व कारवाई करणारे पथक.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!