महिलांनी आरोग्याची काळजी घेताना नियमित व्यायाम मेडिटेशन व संतुलित आहार घ्यावा - डॉ. सुनिताताई पोटे

9 Star News
0

 महिलांनी आरोग्याची काळजी घेताना नियमित व्यायाम मेडिटेशन व संतुलित आहार घ्यावा - डॉ. सुनिताताई पोटे 



शिरूर प्रतिनिधी 

       महिलांचे केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे असून त्यांनी दररोज योगा, व्यायाम व मेडिटेशन तसेच संतुलित आहार घेणे गरजेचे असल्याचा सल्ला महिलांना राही फौंडेशनच्या डॉ सुनीता पोटे यांनी दिला आहे.

       दिनांक १२ जून रोजी राही फौंडेशनच्या वतीने वढू बुद्रुक येथील ‘माहेर’ संस्थेत राहणाऱ्या सर्व मुलींच्या देखभालीसाठी कार्यरत असलेल्या हाऊस मदर महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

        यावेळी राही फौंडेशनच्या डॉ. संतोष पोटे यांनी मार्गदर्शन करताना पोटे हॉस्पिटल, शिरूर यांच्या वतीने ‘माहेर’ संस्थेतील लग्न होऊन गेलेल्या सर्व मुलींची मोफत डिलेव्हरीची जबाबदारी घेतली.

          कार्यक्रमाच्या वेळी माहेर संस्थेच्या संस्थापिका व संचालिका सि. लुसी कुरियन,शिरूर नगरपरिषदेच्या नगरसेविका कविताताई वाटमारे, पाटबंधारे विभागातील मनीषाताई साळुंके, अध्यक्ष हिरा बेगम मुल्ला, मिनी एम. जी., स्वाती पाटील, आथिना नायर, समीक्षा मुळे, शलीदिदी आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश चौधरी, रमेश दुतोंडी हेही उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!