आंतरराष्ट्रीय योग दिन पंचायत समिती शिरूर येथे उत्साहात साजरा
शिरूर प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिरूर पंचायत समिती येथे अधिकारी व कर्मचारी यांनी योग अभ्यास करत मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला.
यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके व गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षक संतोष शेवाळे सर्व उपस्थितांसह योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली .समवेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुका समन्वयक अधिकारी संगीता शेवाळे ही उपस्थित होत्या .
यावेळी शिरूर पंचायत समिती अध्यक्ष श्री होलगुंडे,
बांधकाम विभागाची श्री.गावडे, पशुधन विभागाचे पशुधन पर्यवेक्षक श्रीमंदीलकर, वरिष्ट सहाय्यक राजेंद्र कुरुंदळे, शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक गुलाब खरबस, पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यक श्रीमती सालके, किरण कोरडे, श्री क्षीरसागर उपस्थित होते
.