कारेगावमध्ये महिलेला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

9 Star News
0

 कारेगावमध्ये महिलेला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल


शिरूर ( प्रतिनिधी) 

    कारेगाव (ता. शिरूर) येथे एका विवाहित महिलेला ओळखीचा गैरफायदा घेत धमकावत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेस राजू प्रल्हाद कावरे (रा. करडे रोड, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याशी पूर्वीपासून ओळख होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी राजू कावरे याने महिलेला वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या घरी येत, “मी तुला आणि तुझ्या पतीला जीवे मारेल, समाजात बदनामी करेल,” अशी धमकी देत जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला.

हा प्रकार एकदा नव्हे तर वारंवार घडत असल्यामुळे त्रस्त झालेल्या पीडित महिलेने अखेर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपी राजू प्रल्हाद कावरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे या करत आहेत. गावात या घटनेमुळे खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!