आर.एम.धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर या शाळेत अकरावा जागतिक योग दिन उत्साहात साजरा.

9 Star News
0

 आर.एम.धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर या शाळेत अकरावा जागतिक योग दिन उत्साहात साजरा.


शिरूर प्रतिनिधी 

      आर एम धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूरच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आज जागतिक योग दिना उत्साहात साजरा केला.

       या कार्यक्रमाच्या वेळेला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारू योग 

यांनी योग किती प्राचीन असून त्याचे काय महत्त्व आहे, मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग कसा महत्त्वाचा आहे याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले

      प्रत्येक आसनाचे महत्त्व व शरीरांतर्गत परिणाम सांगत योगशिक्षिका अपर्णा वाळसे यांनी विद्यार्थ्यांकडून ताडासन, वृक्षासन,उष्ट्रासन,वज्रासन, प्राणायाम,ओंकार ध्यान अशाप्रकारे हा वर्ग घेतला व विद्यार्थ्यांनीही सदर वर्गास उत्तम असा प्रतिसाद दिला. विश्वशांती प्रार्थनेने वर्गाची सांगता झाली.

      संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम,शाळा समितीचे सदस्य धरमचंदजी फुल फगर, शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारु यांनी सर्व विद्यार्थ्यांचे सदर उपक्रमासाठी कौतुक केले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!