आंबळेत दाम्पत्याला सशस्त्र चोरट्यांकडून मारहाण करत चोरी
शिरूर
( प्रतिनिधी ) आंबळे ता. शिरूर येथे दांपत्य घरात झोपलेले असताना चौघा सशस्त्र चोरट्यांनी दरवाज्याची कडी उचकटून घरात प्रवेश करून दांपत्याला मारहाण करत लाखोंचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक ४ जून रोजी फिर्यादी आंबळे ता. शिरुर येथील रमेश फुलपगर त्यांचे घरात जेवण करून झोपले असता दिनांक ५ जून मध्यरात्री आंबळे ता. शिरुर येथील रमेश फुलपगर रात्रीच्या सुमारास घरात झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास अचानक दरवाजा वाजवण्याचा आवाज आला काही वेळात हातामध्ये काठ्या व सुरा घेतलेले चार सशस्त्र युवक घरात शिरले त्यांनी रमेश यांना काठ्या व सुऱ्याचा धाक दाखवून घरातील कपाटाची उचकापाचक करत कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम काढून घेतले, त्याच वेळेस दोघांनी रमेश यांच्या पायावर काठीने मारहाण करून रमेश यांच्या पत्नी ललिता यांच्या कानातील व गळ्यातील दागिने जबरदस्तीने काढून घेऊन तब्बल एक लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चौघांनी पोवारा केला, याबाबत रमेश ज्ञानदेव फुलपगर वय ५४ वर्षे रा. आंबळे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके हे करत आहे
.