शिरूर पोलिसांनी हरवलेल्या १३ अल्पवयीन मुली तर ४५ महीला व ३५ पुरुषांचा शोध घेवुन दिले नातेवाईकांच्या ताब्यात - संदेश केंजळे पोलिस निरीक्षक
शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतून घरातुन निघून गेलेल्या १३ अल्पवयीन बालिकांचा शोध घेवून पालकांच्या ताब्यात दिल्या तर हरवलेल्या ४५ महीला व ३५ पुरुष यांचा शोध घेण्यात शिरूर पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकाला यश आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. शिरूर पोलिसांचे या कामगिरीचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
शिरूर शहर तसेच पोलीस स्टेशन हद्दीमधुन जानेवारी २०२५ ते माहे मे २०२५ या कालावधीमध्ये शिरूर पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन बालिका घरामधुन निघुन गेल्याबाबतच्या १३ तक्रारी दाखल झाल्या होत्या.
या अल्पवयीन बालिकांबाबत दाखल गुन्हयांची गांभीर्यता व संवेदनशिलता लक्षात घेवुन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस पथकाला सदरच्या अल्पवयीन बालिकांचा तात्काळ शोध घेणेबाबत आदेश दिले होते. गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषन, बातमीदार यांचेकडुन माहीती काढुन कसोशीने तपास करून आतापर्यंत शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमधील १३ अल्पवयीन बालीकांचा शोध घेवुन त्यांना सुखरूप त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात यश आले आहे.
शिरूर शहर तसेच पोलीस स्टेशन हद्दीमधुन महीला व पुरूष हरवले असल्याबाबत तक्रारी दाखल होत्या. या महीला व पुरुष यांचे संवेदनशिलता लक्षात घेवुन त्यांचा शोध घेण्याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस हवालदार संपत खबाले, पोलीस अंमलदार सोनाजी तावरे, आकाश नेमाणे, पवन तायडे, महीला पोलीस अंमलदार सारिका माळी यांची मिसींग शोध पथकामध्ये नेमणुक करून हरवलेले ४५ महीला व ३५ पुरुषांचा शोध घेवुन त्यांना त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक संदिप गिल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण,, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार मोनीका वाघमारे, प्रतिभा देशमुख, स्नेहल होळकर, गोदावरी धंदरे, परवीण पप्पुवाले, गिता सुळे व मिसींग पथकाचे पोलीस हवालदार संपत खाबाले, पोलीस अंमलदार सोनाजी तावरे, आकाश नेमाणे, पवन तायडे, महीला पोलीस अंमलदार सारीका माळी यांचे पोलीस पथकाने केली आहे.