शिरूर येथे महसूल लोक अदालत मध्ये ४६ दावे तडजोडीने निकाली - बाळासाहेब म्हस्के तहसीलदार, शिरूर

9 Star News
0

 शिरूर येथे महसूल लोक अदालत मध्ये ४६ दावे तडजोडीने निकाली - बाळासाहेब म्हस्के तहसीलदार, शिरूर 


शिरूर दिनांक प्रतिनिधी 

         शिरूर तालुक्यातील महसूल लोक आदालत मध्ये ४६ दावे तडजोडीने निकाली काढली असून या महसूल अदालतीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याची माहिती शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.

       शिरूर तालुक्यातील शिरूर तहसील कार्यालय व १० मंडल मंडळात असे एकूण ११ ठिकाणी एकाच वेळी ९ जून रोजी महसूल लोक आदालत संपन्न झाली.

       या महसुल आदालत मध्ये एकूण ३६३ विविध प्रकारच्या प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती तशा नोटीस ही त्यांना देण्यात आल्या होत्या 

 त्यापैकी ४६ निकाल शिरूर तहसीलदार यांनी लावला असून यामध्ये फेरफार ३३ प्रकरणे, रस्त्याची २ प्रकरणे असणाऱ्या त्रुटी, बांधावरचे अतिक्रमण काढणे १, नावाची चुक १५५ची १० प्रकरणे 

अशा एकूण ४६ केसेस निकाल लागला आहे.

     महसूल दाव्यांमध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीसाठी तयार असल्यास महसूल संख्या कमी होण्यासह सामंजस्याने न्याय मिळविणे सोपे होण्याच्या दृष्टीने शिरूर तालुका तहसिल कार्यालय शिरूर येथे महसूल लोक अदालतीचे आयोजन केले असल्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले.

       यामध्ये महसूल व उपविभागीय अधिकारी यांच्याकडील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती.

अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील अर्धन्यायिक कामकाजामध्ये अनेकवेळा महसूली दावे दाखल झाल्यानंतर विविध कारणांमुळे प्रलंबित राहतात. त्यामुळे बऱ्याच वेळा पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. त्यानंतर जेव्हा दाव्यांचे निकाल दिले जातात तेव्हा एका पक्षाचे समाधान झाले नाही तर ते वरिष्ठ न्यायालयात पुन्हा प्रतिदावे दाखल करतात. विशेषतः जमिनींशी संबंधित प्रलंबीत दाव्यांमध्ये महसुली दाव्यांचे प्रमाण मोठे असून वारंवार महसुली दावे दाखल झाल्यामुळे वर्षानुवर्षे महसुली दावे चालू राहतात. ते निकाली काढण्यासाठी या लोक अदालतीचे आयोजन शिरूर तालुक्यातील सर्व १० मंडल, तहसील कार्यालयात एकाच वेळी असल्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले

.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!