शिरूर, प्रतिनिधी
शिरूर शहराची राज्यात आणि देशात ओळख व्हावी यासाठी शिरूर शहराचा कायापालट करून शेअर आरोग्याने सुसज्ज तर शैक्षणिक हब व्हावे यासाठी शहराच्या विकासासाठी 35 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत दिला असल्याचे शिरूर चे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी सांगून लवकरात लवकर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान याचे नूतनीकरण होणार असल्याचे सांगून त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर चे आमदार यांनी आज शिरूर नगरपरिषद सभागृह येथे नगरपरिषद आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी प्रितम पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रवी काळे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, जिल्हापरिषद माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, बाजार समितीचे माजी अध्यक्ष शशिकांत दसगुडे,राजेंद्र गावडे राजेंद्र कोरेकर, श्रीनिवास घाडगे, शहराध्यक्ष शरद कालेवार, महिला शहराध्यक्ष श्रुतिका झांबरे, महेशबापू ढमढेरे, राजेंद्र शितोळे, जयवंत साळुंखे,रंजन झांबरे, प्रिया बिरादार, सुजाता पाटील,शिरूर नगरपरिषद अधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरूर शहराला पाचशे कोटीचा निधी येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आणणार विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर हवेली या दोन तालुक्याच्या विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे निवडणुकी काळामध्ये सांगितले होते. त्याप्रमाणेच शिरूर शहरासाठी 500 कोटी रुपयांचा निधी आणणार असल्याचे सांगून हा निधी आणण्यासाठी महायुतीच्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन शिष्टमंडळ घेऊन जाण्याची गरज पडल्यास यावे असे सांगताना त्यांनी शहरात फक्त विकास करायचा आहे कुठल्याही पक्षाचे किंवा राजकारण करायचे नाही त्यामुळे सर्व पक्षांना बरोबर घेऊन हा विकास आपल्याला साधायचा असल्याचेही कटके यांनी सांगून शिरूर शहरातील 17 एकर जागा नगरपरिषदेसमोरील जी शासन दरबारी जमा झाली आहे ती जागा पुन्हा मिळवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून याबाबत त्यांनी होकार दर्शवला असून लवकरच या जागे संदर्भातील फाईलवर राज्याचे मुख्यमंत्री यांची सही होऊन ही जागा पुन्हा शहराच्या विकासासाठी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिरूर शहरातील ऐतिहासिक ओळख लक्षात घेता शहरातील प्रमुख असणारा पाच कंदील चौक याचे कायापालट करणार असून शहरातील रस्ते अत्याधुनिक करणार आहेत तर शहरात गार्डन, श्री साडेतीनशे लोकांचे आसान व्यवस्था असणारा ऑडिटर हॉल, अद्यावत क्रीडांगण, तर शिरूर शहराला लागलेली ऐतिहासिक महत्त्व ओळखून शहरातील पुणे शिरूर बायपासवर छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्यावत चित्र, ज्यातून शहराची घोल नदी म्हणून असणारी ओळख याबाबत माहिती मिळणार आहे. तर पाच कोटी रुपये खर्चून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची सुशोभी करून करून अद्यावत बगीच्या या ठिकाणी तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरून स्टाईल चित्र लावण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तर शहरातील नगरपरिषदेसमोर अद्यावत लायब्ररी व व्यापारी संकुलन अद्यावत क्रीडांगण अशा अनेक गोष्टी तसेच चिल्ड्रन लायब्ररी बनवण्याचा मानस आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केला..
शिरूर शहराला व शिरूर शहराच्या विकासात योगदान असणारे उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल धारिवाल, माजी नगराध्यक्ष शहीदखान पठाण, माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे आठवण म्हणून या ठिकाणी त्यांचे ओळख समाजाला व्हावी यासाठी स्मारक उभे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली त्याला यावेळी प्रयत्न करणार असल्याचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी सांगितले.
शिरूर शहरातील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी अद्यावत पार्किंग बीजे कॉर्नर जवळ करण्यात येणार असून, सर्व चौक सुशोभिकरण व त्याठिकाणी शहराला असलेले ऐतिहासिक महत्वाचे शिल्प तयार करून त्यातून त्याचे महत्त्व पटवून देणार असून, अद्यावत क्रीडांगण, नाट्यगृह, लायब्ररी, गार्डन तयार करण्यासाठी माहिती व त्याचे नकाशे तयार केले असून यासाठी चांगल्या अद्यावत ठिकाणी असलेली अद्यावत ठिकाणांना नगरपरिषदेच्या पथकाने भेट दिली असून त्यांचेही मार्गदर्शन घेण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी सांगितले.