शिरूर मध्ये पुन्हा महिलेच्या गळ्यातील दोन लाखाचे गंठण हिसकावले...
शिरूर प्रतिनिधी
शिरूर पाबळफाटा ते रामलिंग रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण १ लाख ८०हजार रुपयांचे हिरव्या दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी जबरदस्तीने चोरून नेले आहे.
याबाबत त्रिवेणी शशिकांत गोळे( वय 35 वर्षे, धंदा घरकाम, रा. श्री हाईट्स रामलिंगरोड शिरूर ता शिरूर जि पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी दोन अनोळखी तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक 05 जून 2025 रोजी पावणे आठ वाजता शिरूर गावचे हद्दीत पाबळ फाटा ते रामलिंग रोडवर अग्निशमन इमारतीच्या अलीकडे वॉशिंग सेन्टरचे समोर फिर्यादी त्यांच्या टि व्ही एस कंपनीची आय क्यु मोटार सायकल नं एम एच 12 एक्स एल 7256 ही वरून राहाते घरी जात असताना वॉशिंग सेंटर जवळ पाठीमागुन एका हिरव्या रंगाचे पल्सर मोटार सायकल यावर दोन इसम 20 ते 25 वयोगटातील यांनी येवुन त्यापैकी पाठीमागे बसलेल्या तरुणाने फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे गंठण किंमत एक लाख ८० हजाराचे जबरदस्तीने ओढुन हिसकावुन घेवुन जबरीने चोरून नेले आहे. याबाबत फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.