शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथील गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

9 Star News
0

 


शिरूर प्रतिनिधी 

     शिरूर पोलिसांनी अवैध गावठी दारू विरोधात कडक कारवाई करत कवठे येमाई येथील गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून कारवाईमध्ये सुमारे १ लाख १३ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

     याप्रकरणी पोलिसांनी सागर गणपत गडगुळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

          तर पोलीस हवालदार बी.के.भवर यांनी फिर्याद दिलीआहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

         याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे सागर गणपत गडगुळ (रा.कवठे येमाई, ता.शिरूर, जि.पुणे) हा कवठे येमाई परिसरातील बाबाजी बगदरे व राज गडगुळ यांच्या शेताजवळील ओढ्याच्या बाजूला गावठी दारू तयार करत असल्याची माहिती शिरूर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीवरून पोलिस हवालदार बी के भंवर, नितीन सुद्रिक, प्रवीण सांगळे या पोलिस पथकाने छापा टाकला त्यात २०० लिटर क्षमता असलेले प्लास्टिकचे निळ्या रंगाचे १५ बॅलर व त्यामधील ३ हजार २०० लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे व जळके रसायन तसेच ५ लिटर गावठी दारू आणि केमिकलयुक्त ५ लिटर ताडी त्याचप्रमाणे गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली भट्टी,लोखंडी व ॲल्युमिनियमची भांडी असा एकूण १ लाख १३ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर आरोपी सागर गडगुळ पोलिसांची चाहूल लागताच उसाच्या शेतात पळून गेला असून,पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर पुढील तपास पोलिस हवालदार वारे करीत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!