शिक्रापुरात कामगाराचा मृतदेह कंपनी गेटवर ठेवत आंदोलनकंपनीप्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामगार मृत झाल्याचा आरोप

9 Star News
0

 शिक्रापुरात कामगाराचा मृतदेह कंपनी गेटवर ठेवत आंदोलनकंपनीप्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामगार मृत झाल्याचा आरोप


शिरूर प्रतिनिधी 

     शिक्रापूर ता.शिरुर येथील ट्रिनिटीइंडिया फोर्जटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कामावर आलेल्या कामगाराला त्रासझाल्यानतर कंपनी प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षमुळे रामपाल सताई दुशद या कामगाराचामृत्यू झाल्याने अन्य कामगार व नातेवाईकांनी मृत कामगाराचा मृतदेह कंपनीच्या गेटवरठेवत कंपनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले असून पोलिसांच्या मध्यस्थीनंतरमृत व्यक्तीचा मृतदेह अंत्यविधी साठी नेण्यात आला आहे. 

      शिक्रापूर ता.शिरुर येथील ट्रिनिटीइंडिया फोर्जटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामगार असलेला रामपालदुशद कामावर आलेला असताना १६ जून रोजी त्याची प्रकृती खालावली दरम्यान त्याला उपचारासाठीनेण्यासाठी कंपनीकडे रुग्णवाहिका नसल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी एक तासउशीर झाल्याने रामपालची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी वाघोली येथे हलवण्यातआले मात्र उपचारादरम्यान अखेर २१ जून रोजी रामपालचा मृत्यू झाल्याने अन्य कामगार वनातेवाईक संतप्त झाले, त्यामुळे आज सकाळच्या सुमारास कामगार व नातेवाईकांनी रामपालचामृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवत कंपनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले,कंपनीच्या गेटवर घोषणाबाजी सुरु होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीसहवालदार संदीप कारंडे, दामोदर होळकर, महिला पोलीस शिपाई पल्लवी वाघोले यांनी घटनास्थळीभेट कामगार व नातेवाईकांशी चर्चा करत घटनेबाबत तक्रार द्या आम्ही कारवाई करु असे आश्वासनदिल्याने अखेर पोलिसांच्या मध्यस्तीने मृत कामगारावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मात्र यावेळी कामगारांनी कंपनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली असताना कंपनी प्रशासनाच्याजबाबदार अधिकाऱ्यांनी एकमेकाकडे बोट दाखवत बोलणे देखील टाळले, तर यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्षजयेश शिंदे व क्रांतिवीर प्रतिष्ठानचे सणसवाडी अध्यक्ष सागर दरेकर यांनी कंपनीमध्येभेट देत कंपनीमध्ये चारशे कामगार असताना एकाही रुग्णवाहिका नसल्याचे पाहून नाराजी व्यक्तकरत कंपनी प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल न झाल्यास आम्ही आक्रमक पवित्राघेणार असल्याचे सांगितले.स्वतंत्र चौकट –शिक्रापूर येथील कंपनी समोर घडलेल्या प्रकारानंतर आम्ही तातडीने भेट देऊनकामगार व मयताचे नातेवाईक यांच्याशी चर्चेनंतर अंत्यविधी पार पडला असून त्याबाबत तक्रारआल्यास योग्य कारवाई केली जाईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख यांनी सांगितले.फोटोखालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथील कंपनी समोर कामगाराचा मृतदेह ठेवून आंदोलन करतानाकामगार व नातेवाईक.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!