शिरूर शहरातील मोटारसायकल सराईत चोरट्यास शिताफीने अटक – संदेश केंजळे

9 Star News
0

 शिरूर शहरातील मोटारसायकल सराईत चोरट्यास शिताफीने अटक – संदेश केंजळे 


शिरूर प्रतिनिधी

शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला शिरूर पोलिसांनी परजिल्ह्यातून शिताफीने अटक करत त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त केली असून हा आरोपी सराईत असून त्याने याअगोदर मोटारसायकल चोरीचे नऊ गुन्हे केले असल्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.

      सदर कारवाईतून शिरूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे तपास पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याला चांगलाच आळा घातला आहे.

        याप्रकरणी बापू गजानन थोरात (वय ३५, रा. बोळेगाव, ता. नि. अहिल्यानगर) याला अटक करून चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

        याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २८ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत शिरूर मार्केटयार्ड येथील मोकळ्या जागेत फिर्यादीने हँडल लॉक करून ठेवलेली होंडा शाईन मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

        या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला आदेश दिले होते. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व तपास पथकाने शिरूर शहरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासात बापू गजानन थोरात (वय ३५, रा. बोळेगाव, ता. नि. अहिल्यानगर) याने सदर चोरी केल्याचे निष्पन्न झाले. परंतु हा आरोपी नागापूर MIDC (अहिल्यानगर) परिसरात आल्याचे गोपनीय बातमीदाराकडून समजले त्याआधारे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप गिल ,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, पोलीस अमंलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रवि काळे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील या पोलीस पथकाने नागापूर MIDC (अहिल्यानगर) परिसरातबापू गजानन थोरात  याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटरसायकल क्र. MH 13 BG 6927) जप्त करण्यात आली असून,या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिवाजी खेडकर करीत आहेत. या आरोपीने याअगोदर पुणे ग्रामीण, पुणे शहर, अहिल्यानगर व पिंपरी-चिंचवड परिसरात यापूर्वी ९ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे 




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!