शिक्रापूरमध्ये पीएमपीएमएल बस चालकाचा राडा भर चौकात पीएमपीएमएलमधील प्रवाशाला बेल्टने मारहाण

9 Star News
0

 शिक्रापूरमध्ये पीएमपीएमएल बस चालकाचा राडाभर चौकात पीएमपीएमएलमधील प्रवाशाला बेल्टने मारहाण


शिरूर
(  प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील चौकात एका पीएमपीएमएल बसच्या चालकाने पुणे ते तळेगाव ढमढेरे मार्गावरील एका प्रवाशाला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली असून सदर बस चालकावर कारवाईची मागणी नागरिक व प्रवाशी करत आहे. घटना घडून दोन दिवस झाले तरी अद्याप मुजोर चालकावर कार्यवाही झालेली नाही यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
                         शिक्रापूर ता. शिरुर येथे पुण्याहून प्रवाशी घेऊन आलेल्या बस मधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बसवरील चालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने तसेच अपघात होईल अशा पद्धतीने बस चालवत असल्याने प्रवाशी चौकात उतरले यावेळी काही प्रवाशी बस चालकाला जाब विचारात असताना बस चालकाने कमरेचा पट्टा काढून प्रवाशाला मारहाण सुरु केली, दरम्यान दुसऱ्या बाजूने आलेल्या बसच्या चालक व वाहकांनी देखील सदर चालकाला पकडून बस मध्ये बसण्यास सांगितले मात्र चालक नशेमुळे कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता मात्र सदर बस चालकाच्या कृत्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याने नागरिक हैराण झाले असून बस चालकावर कारवाईची मागणी केली जात आहे.
स्वतंत्र चौकट १ –
शिक्रापूर येथील घडलेल्या घटनेबाबत फोनवर माहिती मिळाली असून सदर व्हिडीओ बाबत माहिती घेऊन चौकशी करुन चालकावर कारवाई केली जाणार असल्याचे बस आगार व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे भर चौकात प्रवाशांना मारहाण करत धिंगाणा घालताना बस चालक.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!