शिरूर शहरातील मोटारसायकल चोरी व साहित्य चोरी प्रकरणी सराईत चोरटा गजाआड; पाच गुन्ह्यांचा पर्दाफाश — शिरूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

9 Star News
0

 शिरूर शहरातील मोटारसायकल चोरी व साहित्य चोरी प्रकरणी सराईत चोरटा गजाआड; पाच गुन्ह्यांचा पर्दाफाश — शिरूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी



शिरूर, प्रतिनिधी

     शिरूर शहरात मोटर सायकल चोरी करणाऱ्या सराई चोरट्याला शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने पकडले असून त्याच्याकडून चोरीच्या चार मोटरसायकल जप्त करण्यात आले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.

    याबाबत आर्यन एअरपोस पवार (रा. शिंदेवाडी, आष्टापूर, सध्या रा. शिरूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक १५ मे रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १६ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या वेळेत गुजरमळा, शिरूर येथील डॉक्टर राम मगर यांच्या बांधकाम ठिकाणाहून ६५ हजार रुपयांचे लोखंडी साहित्य चोरीस गेले होते. यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

        याबाबत पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी गुन्ह्याचा तात्काळ तपास करण्याचे आदेश तपास पथकाला दिले. शिरूर पोलिस स्टेशन तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण ,नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रवि काळे, रविंद्र आव्हाड आणि अजय पाटील या पथकाने 

तपासादरम्यान, गोपनीय माहिती व तांत्रिक माहिती व सीसी टीव्ही कॅमेरे तपास करीत आरोपी आर्यन एअरपोस पवार (रा. शिंदेवाडी, आष्टापूर, सध्या रा. शिरूर) याने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न कझाले

. पोलिस पथकाने शिताफीने आर्यन याला पकडले असता त्याने मोटर सायकल चोरीची कबुली दिली असून त्याने या चोऱ्या साथीदार रोहित भोसले (रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरूर) याच्यासह शिरूर शहरातून मे महिन्यात पाच मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून यातील चार मोटर सायकल पोलिसांनी जप्त केल्या आहे. 

     पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!