न्हावरा ता. शिरूर येथे अवैध गुटखा वाहतुकीवर शिरूर पोलीसांची धडक कारवाई; १.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटकेत

9 Star News
0

 अवैध गुटखा वाहतुकीवर शिरूर पोलीसांची धडक कारवाई; १.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटकेत



शिरूर, प्रतिनिधी

      न्हावरा ता. शिरूर येथे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या रिक्षावर पोलिसांनी छापा टाकून या छाप्यात १ लाख,४४ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला असून एकावर कार्यवाही करण्यात आली आहे. शिरूर शहरातील अवैध गुटखा व्यवसाय व गुटखा वाहतूक करणाऱ्यावर शिरूर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून यामुळे अवैध गुटखा वाहतूक व अवैध विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.       

    या प्रकरणी आरोपी संगमनाथ नागनाथ कनजे (रा. शिक्षक कॉलनी, रामलिंग रोड, शिरूर) यास अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी दिपक गुगळे (रा. वनविभाग कार्यालय शेजारी, शिरूर) याचा पोलीस शोध घेत आहेत.

      शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व साठवणूक यावर कठोर कारवाई शिरूर पोलिसांनी सुरू केली असून,दिनांक १२ जून २०२५ रोजी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राहुल भवर यांना गोपनीय माहिती मिळाली की शिरूर पुणे रस्त्यावर रिक्षा मधून अवैध गुटखा वाहतूक होत आहे. याबाबत 

 माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन सुद्रिक, प्रविण सांगळे व राहुल भवर यांनी न्हावरा फाटा, कानिफनाथ मंदिराजवळ, शिरूर येथे गोपनीय माहिती मिळालेल्या एमएच १२ आरपी २६७२ या क्रमांकाची काळी-पिवळी पॅसेंजर रिक्षा थांबवून तिची तपासणी केली असता, त्यामध्ये हिरा पानमसाला गुटखा व रॉयल ७१७ कंपनीचे सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ एकूण ४४ हजार रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य माल तसेच १ लाख रुपयांची रिक्षा असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

      या प्रकरणी आरोपी संगमनाथ नागनाथ कनजे (रा. शिक्षक कॉलनी, रामलिंग रोड, शिरूर) यास अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी दिपक गुगळे (रा. वनविभाग कार्यालय शेजारी, शिरूर) याचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन सुद्रिक करत आ

हे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!