शिरूर येथील आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूरच्या विद्यार्थ्यांची एन.सी.सी कॅम्पसाठी निवड;
शिरूर (प्रतिनिधी) –
शिरूर शहरातील आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या २५ विद्यार्थ्यांची एन.सी.सी.कॅम्प साठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक अश्विनी घारु यांनी दिली आहे.
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूलने एक महत्त्वाची शैक्षणिक व सामाजिक कामगिरी बजावत, विद्यार्थ्यांना एन.सी.सी. (राष्ट्रीय छात्र सेने) च्या शिस्तप्रियतेच्या मार्गावर नेण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबवला आहे. ही शिरूर तालुक्यातील पहिलीच इंग्रजी माध्यमातील शाळा आहे ज्यामध्ये एन.सी.सी.ची सुरूवात मागील शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली आहे.
सध्या शाळेतील इयत्ता आठवीच्या वर्गातील एकूण २५ विद्यार्थ्यांची एन.सी.सी.साठी निवड झाली असून, त्यापैकी २२ विद्यार्थ्यांची बुधवार, दिनांक १८ मे २०२५ रोजी दहा दिवसांच्या एन.सी.सी प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदाऱ्या, ड्रिल, साहसी उपक्रम तसेच छोट्या-मोठ्या हत्यारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा सर्वांगीण विकास घडून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मागील शैक्षणिक वर्षात २५ विद्यार्थी एन.सी.सी. मध्ये होते आणि यावर्षी पुन्हा २५ विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे एकूण ५० विद्यार्थ्यांची सक्रिय एन.सी.सी. तुकडी शाळेत कार्यरत आहे.
या यशामागे शाळेतील एन.सी.सी समन्वयक शिक्षक रवी कुरुंदळे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.