शिरूर पोलिसांना CPR चे प्रशिक्षण; डॉ. मयूर तायडे यांचे मार्गदर्शन.. ..रुबी हॉल क्लिनिक (धारिवाल हॉस्पिटल) उपक्रम

9 Star News
0

 शिरूर पोलिसांना CPR चे प्रशिक्षण; डॉ. मयूर तायडे यांचे मार्गदर्शन.. ..रुबी हॉल क्लिनिक (धारिवाल हॉस्पिटल) उपक्रम 



शिरूर प्रतिनिधी

     "CPR कसे द्यायचे याबाबत माहिती असणे आवश्यक असून, ही माहिती आत्मसात केल्यास आपण एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो," असा विश्वास सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मयूर तायडे यांनी व्यक्त केला.

      शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या सूचनेवरून रुबी हॉल क्लिनिक (धारिवाल हॉस्पिटल), शिरूर यांच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी CPR (Cardiopulmonary Resuscitation) प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. मयूर तायडे यांनी प्रत्यक्ष डेमोच्या माध्यमातून CPR प्रक्रिया समजावून सांगितली. हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णावर योग्य पद्धतीने आणि वेळेत CPR केल्यास त्याचा जीव वाचू शकतो, याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाला रुबी हॉल क्लिनिक शिरूर (धारिवाल हॉस्पिटल) चे युनिट हेड मायकल पॉल, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि शिरूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     या प्रशिक्षण कार्यक्रमात हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. मयूर तायडे यांनी प्रत्यक्ष डेमोच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांना CPR कसे द्यावे याचे सखोल प्रशिक्षण दिले. हृदयविकाराच्या झटक्याने कोसळलेल्या रुग्णावर प्राथमिक उपचार म्हणून CPR कसे उपयुक्त ठरते आणि त्या माध्यमातून रुग्णाचा जीव वाचवता येतो, याविषयी माहिती देण्यात आली.

हा उपक्रम पोलीस दलाच्या आपत्कालीन सेवेसाठी सजगतेचे आणि तत्परतेचे उत्तम उदाहरण ठरला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!