शिरुर, प्रतिनिधी
शिरुर शहरातील गुजरमळा परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी सहा वर्षाच्या मुलासह सतरा जणांना चावा घेतल्याने परिसरात घबराट पसरली असून, शिरूरचे मुख्याधिकारी यांनी यात लक्ष घालून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक महिला व नागरिकांनी केली आहे.
याबाबत महिला नागरिक नगरपरिषद विरोधात आक्रमक झाले आहे.
दिनांक २५ मे रोजी, दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी खेळत असलेल्या सहा वर्षीय ईशांत राजेंद्र दारोळे याच्यावर जीवघेणा हल्ला करत चावा घेतला. त्याला जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या परिसरात दोन कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून आत्तापर्यंत १७ पेक्षा अधिक लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
या घटनेनंतर संतप्त महिलांनी एकत्र येऊन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी शिरूर नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे माजी सभापती विठ्ठलराव पवार, सविता वाबळे, संध्या दारोळे , सविता बोरुडे छाया यादव ,धनश्री मच्छिंद्र कदम, नंदा संतोष नवले, राजश्री रोकडे, सिंधू सोमनाथ पळसकर, पूजा भास्कर हरिहर , प्रीती प्रकाश बनसोडे ,पूजा भोंडवे ,सुप्रिया गावडे ,रश्मी जगदाळे, नितीन यादव ,आशिष पळसकर, दत्तात्रय शेलार, महेश कुरंदळे, महेश पठारे ,सुहास वाबळे आदी उपस्थित होते.
सामजिक कार्यकर्त्या सविता दारोळे म्हणाल्या की माझा भाचा ईशांत हा काल घराबाहेर खेळत असताना दोन पिसाळलेली कुत्री आली व त्यांनी ईशांतचा चावा घेतला .यामुळे तो जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. नगरपरिषद प्रशासनाने मोकाट कुत्र्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली असून, एखादा अनुचित प्रकार होण्याची वाट नगर परिषद पाहते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्थानिक रहिवासी सविता वाबळे यांनी सांगितले की काही दिवसापूर्वी माझ्या ही मुलाला कुत्र्याने चावा घेतला होता. मोकाट व अनिर्बंध कुत्र्यांच्या संख्येमुळे मुले घराबाहेर येऊ शकत नाहीत .कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने केला पाहिजे .
सविता भोंडवे यांनी सांगितलं की माझ्याही मुलाला काही दिवसापूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता .वारंवार गुजर कॉलनी परिसरातील मोकाट कुत्रे मुलांना व जेष्ठ नागरिकांना चावे घेतात याबाबत नगरपरिषद गांभीर्याने उपाययोजना करावी .
शिरुर नगर परिषदेचे माजी सभापती विठ्ठलराव पवार यांनी सांगितले की गुजर मळा परिसरात गेल्या काही दिवसापासून १७ जणांना कुत्र्यानी चावा घेतला आहे. गुजर कॉलनी परिसरातील एक काळ्या रंगाचे व एक पांढऱ्या रंगाचे अशी दोन पिसाळलेली कुत्रे ही लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चावतात .या कुत्र्यांच्यामुळे कोणाच्या बळी गेल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला .
मोकाट कुत्र्यांच्या उच्छादामुळे जेष्ठ नागरिक व लहान मुले यांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पालिकेने यावर तातडीने उपाययोजना करावी.
गुजर कॉलनीतील देवांश पळसकर वय -६ याला दोन वर्षात तीन वेळा कुत्रे चावले .तर श्रेयस पोटे , महादेव चव्हाण , शंभूराजे शेलार , वंश वाबळे , ईशा रावडे , संदेश भोंडवे , मयूरेश कदम , आयुष हरिहर ,दरेकर आजोबा ( वय -८० ) गौरव गिरमकर ,यांनाही काही दिवसापूर्वी गुजर कॉलनीत कुत्रे चावल्याचे पवार यांनी सांगितले .
सामजिक कार्यकर्त्या सविता दारोळे म्हणाल्या की माझा भाचा ईशांत हा काल घराबाहेर खेळत असताना दोन पिसाळलेली कुत्री आली व त्यांनी ईशांतचा चावा घेतला .यामुळे तो जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. नगरपरिषद प्रशासनाने मोकाट कुत्र्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली असून, एखादा अनुचित प्रकार होण्याची वाट नगर परिषद पाहते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्थानिक रहिवासी सविता वाबळे यांनी सांगितले की काही दिवसापूर्वी माझ्या ही मुलाला कुत्र्याने चावा घेतला होता. मोकाट व अनिर्बंध कुत्र्यांच्या संख्येमुळे मुले घराबाहेर येऊ शकत नाहीत .कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने केला पाहिजे .
सविता भोंडवे यांनी सांगितलं की माझ्याही मुलाला काही दिवसापूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता .वारंवार गुजर कॉलनी परिसरातील मोकाट कुत्रे मुलांना व जेष्ठ नागरिकांना चावे घेतात याबाबत नगरपरिषद गांभीर्याने उपाययोजना करावी .
शिरुर नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे माजी सभापती विठ्ठलराव पवार यांनी सांगितले की गुजर मळा परिसरात गेल्या काही दिवसापासून १७ जणांना कुत्र्यानी चावा घेतला आहे. गुजर कॉलनी परिसरातील एक काळ्या रंगाचे व एक पांढऱ्या रंगाचे अशी दोन पिसाळलेली कुत्रे ही लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चावतात .या कुत्र्यांच्यामुळे कोणाच्या बळी गेल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला
याबाबत पालिकेचे स्वच्छता अधिकारी शिरूर शहरातील मोकाट कुत्र्यांवर मागील दोन वर्षापासून कुत्र्याचे निर्बिजीकरण करण्यात येत आहे .गुजर कॉलनी परिसरातील दोन मोकाट कुत्र्यांना पकडण्याचा प्रयत्न पालिकेच्या पथकाने वारंवार केला परंतु ही कुत्री सापडू शकली नाही. यासंदर्भात मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना अहवाल सादर करून कारवाई करण्यात येणार आहे.
दत्तात्रय बर्गे , स्वच्छता निरीक्षक, शिरूर नगर परिषद