महाराष्ट्र दिनानिमित्त शिरूरमध्ये रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर; ११० रक्तदात्यांचा सहभाग
शिरूर | प्रतिनिधी
महाराष्ट्र दिन व दुर्गा दिनाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान व वी लव्ह शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात ११० रक्तदात्यानी रक्तदान केले.
हे शिबिर गुरुवार, दि. १ मे रोजी शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात पार पडले.
या शिबिरात एकूण ११० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक भान जपले, तर अनेक नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
या प्रसंगी सर्व रक्तदात्यांना ‘अंतः अस्ति प्रारंभ’ हे प्रेरणादायी पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृणाल काळे, अक्षय ढमढेरे, सुनील इंदुलकर, सागर परभणे, भूषण थोरात, भूषण खैरे, योगेश फाळके, विकास सांबारे, पराग खराडे, ऋषिकेश गुजर, रामराज गवारे, योगेश पवार, हेमंत नेपाळी, ओंकार शेळके, प्रतिक काशीकर, राजन बोरुडे, मोहित माने, प्रतिक गिरी, अजिंक्य महाजन आदींनी विशेष मेहनत घेतली.
या वेळी भाजप महिला शहराध्यक्षा प्रिया बिरादार, आदिशक्ती महिला मंडळाच्या शशिकला काळे, तसेच मनसे महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. वैशाली साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.