शिरूर महसुली गाव विभाजनास विलंब –सरपंच जगदीश पाचर्णे व ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

9 Star News
0

 शिरूर महसुली गाव विभाजनास विलंब –सरपंच जगदीश पाचर्णे व ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण


शिरूर | प्रतिनिधी

           शिरूर तालुक्यातील अण्णापूर, सरदवाडी, कर्डेलवाडी आणि तर्डोबाचीवाडी या ग्रामपंचायतींचे महसुली गाव विभाजन गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भातील वारंवार निवेदने आणि पत्रव्यवहार असूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने आज, २ मे रोजी तरडोबावाडी सरपंच जगदीश पाचर्णेशिरूर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले असून या चारही गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी या उपोषणाला पाठिंबा दिला.

    यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे,अण्णापूर उपसरपंच संतोष शिंदे, माजी नगरसेवक नितीन पाचर्णे, उपसरपंच लक्ष्मण कर्डिले, ,बाजार समितीचे माजी संचालक संतोष मोरे, माजी सरपंच सुरेखा कर्डिले,माजी उपसरपंच अमोल देवकाते, उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

       सन 1993 मध्ये ग्रामपंचायत स्तरावर स्वतंत्र अस्तित्व मिळाल्यानंतरही महसुली नोंदी, ७/१२ उतारे, मिळकत दाखले, वडिलोपार्जित मालमत्तेच्या नोंदी यामध्ये सातत्याने अडचणी येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महसुली सजा विभाजन अद्यापही न झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही दखल न घेतल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.

         उपोषणस्थळी तर्डोबाचीवाडीचे सरपंच, गाव समिती सदस्य, महिला, युवक व वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देत तातडीने गावांचे महसुली विभाजन करण्याची मागणी केली. तहसील कार्यालयाच्या वतीने निवेदन स्वीकारण्यात आले असून, लवकरच वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी 

दिले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!