घोड धरण परिसरातून साडेसहा लाखांची माती चोरी; शिरुर पोलिसात गुन्हा दाखल.... कोळगाव डोळस नंतर शिंदोडीत माती चोरी प्रशासनाला माती तस्करांचे आव्हान....

9 Star News
0

 घोड धरण परिसरातून साडेसहा लाखांची माती चोरी; शिरुर पोलिसात गुन्हा दाखल.... कोळगाव डोळस नंतर शिंदोडीत माती चोरी प्रशासनाला माती तस्करांचे आव्हान....


शिंदोडी (ता. शिरुर) | प्रतिनिधी

शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथील घोड धरणाच्या हद्दीतून सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीची माती चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना घोड धरणालगतच्या गट क्र. २२३ आणि २१७ क्षेत्राच्या पूर्व बाजूस घडली असून, शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिरुर तहसील कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तक्रारीनंतर मंडल अधिकारी नंदकुमार संपतराव खरात (वय ४९, रा. बाबुराव नगर, शिरुर; मूळ रा. पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा) यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा करताना चारशे ब्रास माती बेकायदेशीररीत्या चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. या मातीची अंदाजे किंमत ६ लाख ५० हजार रुपये असल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मंडल अधिकारी खरात यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार प्रताप टेंगले तपास करत आहेत. बेकायदेशीर उत्खननासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री आणि वाहतूक साधने याचा शोध घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!