शिरुर महसुलच्या अजब अधिकाऱ्यांचा गजब कारभार; आधी पंचनामा नंतर अज्ञात माती चोरांविरोधात फिर्याद...?

9 Star News
0

 शिरुर महसुलच्या अजब अधिकाऱ्यांचा गजब कारभार; आधी पंचनामा नंतर अज्ञात माती चोरांविरोधात फिर्याद...?



शिरूर प्रतिनिधी शिरुर तहसीलदार कार्यालयाच्या सावळ्या गोंधळाबाबत अनेकवेळा प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना तहसीलचा दुसरा एक अजब कारभार समोर आला आहे. शिंदोडी गावात अवैध माती उपशाबाबत तलाठी अलिशा महाकाल यांनी आधी पंचनामा केला. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी मातीचोरी केल्याची शिरुर पोलिस स्टेशन येथे मंडल अधिकारी संपत खरात यांनी तक्रार दाखल केली. 


अ‍ॅड विनायक लक्ष्मण फडके (रा. यशोदिप सोसायटी,वारजे माळवाडी, पुणे) यांच्या शिंदोडी गावातील गट नं २२३ च्या लगत असणाऱ्या मळईतुन अवैध माती उत्खनन करुन ती माती गावातील इतर लोकांना विकल्याचा प्रकार झाला होता. याबाबत विनायक फडके यांनी २८ मार्च २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रितसर अर्ज दाखल केला होता. त्याच दिवशी शिंदोडी च्या तलाठी अलिशा महाकाल यांनी उत्खनन केलेल्या जागेवर जाऊन पंचनामा केला होता. 


त्यानंतर विनायक फडके यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर उशिरा जाग आलेल्या महसूल खात्याने तब्बल एक महिन्यानंतर ३० एप्रिल २०२५ रोजी मंडल अधिकारी संपत खरात यांनी शिंदोडी येथील गट नं २२३ आणि गट नं २१७ मधुन अज्ञात व्यक्तीनी ६ लाख ४४ हजारांची मातीचोरी केल्याची तक्रार दाखल केली. तलाठी यांनी पंचनामा केल्यानंतर अवैध माती उत्खनन करणारी वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर रितसर कारवाई करणे अपेक्षित असताना महसूलच्या अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत टाळाटाळ केली. 


त्यामुळे त्यानंतरही अवैध माती उत्खनन सुरुच राहिल्याने विनायक फडके यांनी वेळोवेळी पुणे जिल्हाधिकारी, पुणे खनिकर्म विभाग, पुणे ग्रामीण अधिक्षक यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या. तसेच त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यानंतर दि १३ मे २०२५ रोजी शिरुर पोलिस येथे अजित ओव्हाळ, नंदु ओव्हाळ, तात्याभाऊ ओव्हाळ, कृष्णाबाई आण्णा माने, राजेंद्र उमाजी माने (सर्वजण, रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे) या पाच व्यक्तीविरोधात अवैध माती उत्खनन केल्याप्रकरणी फडके यांनी रीतसर गुन्हा दाखल केला आहे. 

(क्रमशः)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!