शिरूरच्या जीवन विकास मंदिर शाळेचा १० वीचा उत्तम निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांनी राखली यशाची परंपरा
शिरूर प्रतिनिधी
शिरूरच्या जीवन विकास मंदिर शाळेचा १० वी बोर्डाचा परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या उज्ज्वल परंपरेत भर घातली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या जोरावर उच्च टक्केवारी मिळवत पालक, शिक्षक आणि शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
उल्लेखनीय गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
आरुष गंगाधर तोडमल – 96.60%,
आकांक्षा रामदास गुप्ता – 95.20%,
बुद्धरत्न संतोष गायकवाड – 87.80%
प्रितेश मिलिंद नवले – 84.20 टक्के ,
अनिकेत गणेश तावरे – 83.80%
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जीवन विकास मंदिर शाळेचे अध्यक्ष रवींद्र धनक, मुख्याध्यापक गंगाधर तोडमल, यांनी अभिनंदन केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी, पालकांनी आणि शाळा व्यवस्थापनाने अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी मेहनत, चिकाटी आणि शिस्त या त्रिसूत्रीच्या आधारे हे यश संपादन केल्याचे शिक्षकां
चे मत आहे.