शिरूर तहसील कार्यालय पर्यावरणपूरक इमारत( 'ग्रीन बिल्डिंग') म्हणून विकसित होणार

9 Star News
0

 शिरूर तहसील कार्यालय पर्यावरणपूरक इमारत( 'ग्रीन बिल्डिंग') म्हणून विकसित होणार 


शिरूर, प्रतिनिधी 

     शिरूर तहसील कार्यालय लवकरच 'ग्रीन बिल्डिंग' (पर्यावरणपूरक इमारत) म्हणून विकसित होणार असून या इमारतीसाठीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे टेंडर मंजूर झाले असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली यामुळे संपूर्ण कार्यालयाला सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा होणार आहे.

    यावेळी नायब तहसीलदार विनायक कौलकर आणि तालुका पुरवठा निरीक्षक सदाशिव व्हनमाने हे देखील उपस्थित होते.

       यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले 

सौर ऊर्जा प्रकल्प: कार्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार असल्याने संपूर्ण कार्यालयाला यापुढे सौर ऊर्जेवर आधारित वीजपुरवठा होईल.

कार्यालयीन सुधारणा: शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन इमारत आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. इमारतीची दुरुस्ती, विद्युत कामे, फर्निचर आणि इतर कामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी शासनाकडे मागण्यात आला आहे.

        शिरूर तालुक्यात आतापर्यंत ४१ पाणंद रस्ते खुले करण्यात आले आहेत. तसेच १७१ वहिवाटीच्या रस्त्यांसंदर्भात निकाल देण्यात आले आहेत.

प्रलंबित प्रश्न मार्गी: वडगाव रासाई येथील २०१० पासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे.

दाखले वाटप: गेल्या दोन वर्षांत तहसील कार्यालयातून उत्पन्न, अधिवास (डोमासाईल), जातीचे दाखले आणि अन्य असे एकूण ८७ हजार दाखले वाटप करण्यात आले आहेत.

डिजिटायझेशन मोहीम: शिरूर तहसील कार्यालयात २२ लाख विविध शासकीय कागदपत्रांचे रेकॉर्ड आहे. त्यापैकी आतापर्यंत २ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. पुढील अडीच महिन्यांत संपूर्ण २२ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण करण्याचा मानस असून, हे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध होऊन जलद प्रशासकीय सेवा मिळेल, असे मस्के यांनी सांगितले.

       तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ११६४ प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यात श्रावणबाळ योजनेअंतर्गत ११६४ प्रकरणे मंजूर झाली असून, ८ प्रकरणे अपात्र ठरली आहेत.

       शिरूर तालुक्यात सध्या ८०,०५३ शिधापत्रिका धारक आहेत. गेल्या दोन वर्षांत ११,९४८ नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या असून, त्यातून ३५,१४२ लाभार्थींना फायदा झाला आहे. यामध्ये अंत्योदयचे २०३, प्राधान्य कुटुंबाचे ७७३५ आणि बिगर प्राधान्यक्रमाचे ४०१० शिधापत्रिकांचा समावेश असल्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सां

गितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!