शिरूर प्रतिनिधी
शिरूर बसस्थानकामध्ये सुविधांचा अभाव झाला असून यामुळे महिला नागरी प्रवासी मेटाकुटीला आले आहे तर रस्त्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे याच्या विरोधात शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यामध्ये झोपून आगळे वेगळे अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तर एसटी महामंडळ यांनी पुन्हा एकदा लेखी आश्वासन दिले आहे.
आज शिरूर बसस्थानक येथे ज्या ठिकाणी बसायची एकदा असते त्या ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यामध्ये झोपून आज प्रशासनाचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश फुलडाळे यांच्यासह , प्रवासी संघटनेचे अनिल बांडे , आदमी पक्षाचे ॲड. सुभाष जैन , राष्ट्रवादी कॉग्रेसचे नोटरी रवींद्र खांडरे, आधार छाया प्रतिष्ठानचा सविता बोरुडे,भाजपाचे प्रिया बिरादार , विजय नरके , व्यापारी महेंद्र बोरा,राजेंद्र शहाणे , मनसेच्या डॉ . वैशाली साखरे ,अविनाश घोगरे , राजेंद्र महाजन , शंकर चाबुकस्वार, सोहेल शेख , शांतीलाल नहार , बाळासाहेब तातेड , अशोक गुळांदे , बाळासाहेब आवारी , विलास देठे , कोमल भणगे , हीना शेख , प्रीती बनसोडे शंकर चाबुकस्वार, सोहेल शेख , शांतीलाल नहार आदी उपस्थित होते
यावेळी आंदोलन करते प्रितेश फुलडाळे यांनी या अगोदर उपोषण केले होते यावेळेस एसटी महामंडळाने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाला एसटी महामंडळाने हरताळ फासला आहे. त्यामुळे आंदोलन करताना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ एसटी महामंडळाने आणली आहे.
शिरूर एसटी बस स्थानक हे ऐतिहासिक बस स्थानक म्हणून ओळखले जाते या बस स्थानकास नवीन 10 बस गाड्या मिळणे,मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,स्वच्छता स्वच्छलया मध्ये पाणी उपलब्ध करून देणे, शुद्ध पिण्यासाठी फिल्टर बसवणे, हिरकणी कक्ष सुविधा झाली पाहिजे,महिलांच्या सुरक्षेबाबत तसेच अनेक इतर स्थानिक समस्या, मागणीसाठी शिरूर शहरातील सर्वपक्षीय,सर्व संघटना तसेच सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, सर्व व्यापारी बंधू,स्थानिक नागरिक यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.