शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे महिला व दोन मुलं या तिहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांचे विशेष पथक करत असून यासाठी सीसीटीव्ही व तांत्रिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून लवकरच पोलिसांना यश येईल असा विश्वास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी व्यक्त केला.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी आज रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला भेट दिली त्यावेळेस त्यांनी ही माहिती दिली. यावेळी या तिहेरी हत्याकांडाचा तपास करण्यासाठी रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या रिया हॉलमध्ये शिरूर तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी शिरूर पोलिस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे , शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड उपस्थित होते.
रांजणगाव गणपती येथील तिहेरी हत्याकांड तपासाबाबत सांगताना पोलीस अधीक्षक संदीप गिल म्हणाले पोलीस पथक सर्व बाजूंनी व राज्यातील पोलिस स्टेशन येथे अशा प्रकारे मिसिंग महिला व तिची दोन मुले यांची चौकशी करत आहे
तपासा दरम्यान पोलिसांना यात दोन मिसिंग अशाप्रकारे आढळून आल्या परंतु त्याचा तपास करत असताना दोन्ही मिसिंग महिला व मुले मिळून आली आहे. त्याप्रमाणे आता पोलीस पथक विशेष पथकाच्या साह्याने सीसीटीव्ही व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे या गुन्ह्याचा शोध घेण्याचे काम करीत आहे.
तसेच या महिलेचे व मुलांचे ज्या प्रकारचे फोटो सापडले ते राज्यातील सर्व पोलीस स्टेशनला पाठवले आहे. तसेच या भागातही या फोटोवरून काही माहिती मिळते का असे आव्हान नागरिकांना केले आहे.
याबाबत शिरूर तालुक्यातील पोलीस पाटलांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांची ही बैठक घेण्याचे काम सुरू आहे. अशा विविध माध्यमातून नागरिकांना याबाबत काय माहिती असल्यास किंवा या महिले व मुलांबाबत माहिती असेल तर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे किंवा पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल पुणे यांना माहिती द्यावी माहिती देणारे चे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहनही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी केले आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या रिया हॉलमध्ये तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक घेऊन त्यांनाही तुम्हाला या तिहेरी हत्याकांडाची महिला व मुलांचे फोटो माहिती पाठवण्यात आली आहे.या माहितीच्या आधारे आपल्या भागात माहिती घ्यावी ही माहिती नागरिकांपर्यंत औद्योगिक परिसरात इतर ठिकाणी पोहचवून तसेच
सोशल मीडियाच्या माध्यमातून या गुन्ह्याच्या तपासासाठी सहकार्य करावे व काही सूचनाही पोलिस पाटील यांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी केल्या आहे.