अविरत देशसेवेची 22 वर्षे पूर्ण – आखाडे गावचे सुपुत्र महादेव सूर्यकांत शेलार यांचा भव्य नागरी सत्कार
जावळी (प्रतिनिधी) –
जावळी तालुक्यातील आखाडे गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यदलात अविरत 22 वर्षे देशसेवा केलेले शूर सैनिक महादेव सूर्यकांत शेलार यांची सेवानिवृत्ती नुकतीच झाली. त्यांच्या देशसेवेचा गौरव करण्यासाठी आखाडे गावात भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सत्कार समारंभ गावातील ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साही आणि स्नेहपूर्ण वतावरणात पार पडणार आहे.. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गावातील मान्यवर, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
महादेव शेलार यांनी आपल्या सेवाकाळात देशाच्या विविध सीमांवर कार्य करत असताना शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा या मूल्यांची नेहमीच जपणूक केली. त्यांच्या सेवेबद्दल गावकऱ्यांमध्ये अभिमानाचे आणि कृतज्ञतेचे वातावरण होते.
या वेळी बोलताना शेलार म्हणाले, "माझ्या या २२ वर्षांच्या सेवेमध्ये मी मातृभूमीची सेवा करत असताना आपल्या गावाचा आणि कुटुंबाचा पाठिंबा नेहमीच माझ्या पाठीशी होता. ही सेवा ही केवळ माझीच नव्हे, तर आखाडे गावाच्या प्रत्येक नागरिकाची आहे."