शिक्रापुरात पैशाचा पाऊस... आणि बोगस पोलिसांची धाड – तिघांना अटक

9 Star News
0

 शिक्रापुरात पैशाचा पाऊस... आणि बोगस पोलिसांची धाड – तिघांना अटक



शिरूर प्रतिनिधी दि. १३ (वार्ताहर): 

       शिक्रापूर येथे ‘पैशाचा पाऊस पाडतो’ असे आमिष दाखवून एका युवकाची फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे, फसवणुकीच्या वेळी स्वतःला पोलिस म्हणून ओळख देणाऱ्या तोतया पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकत पैसे जप्त करत पळ काढला. मात्र, सतर्क नागरिकांच्या मदतीने तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

     विशाल भगवान घाग (वय ५३, रा. कल्याण, ठाणे), निलेश ओमप्रकाश सावंत (वय ५३, रा. डोंबिवली पूर्व, ठाणे), आणि बशीर इब्राहीम शेख (रा. कसारा, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

       शिक्रापूरमधील संतोष भुजबळ याला पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत तिघांनी विश्वासात घेतले व आळेफाटा येथे बोलावून घेत पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर चौघे शिक्रापूर येथील बुधे वस्तीवर आले. एका घरात पाच लाख रुपये व काही साहित्य ठेवून विधी सुरु केला.

    त्याचवेळी पोलीस वेशात आणखी तीन जणांनी धाड टाकली. “आम्ही पोलीस आहोत, जादूटोणा करता का?” असे म्हणत त्यांनी पैसे व तिघांना ताब्यात घेतले आणि स्वतःच्या वाहनातून पळ काढला.

     फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित युवकाच्या मित्रांनी पाठलाग सुरु केला. तब्बल ३० किमीचा पाठलाग करत चाकण येथे त्यांची कार अडवण्यात आली. झटापटीनंतर तिघेजण पैसे घेऊन पळाले. मात्र, म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास घाडगे आणि अमोल माटे यांनी तिघांना अटक केली.

त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी अधिक चौकशी करून आरोपींना आळेफाटा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!