मांडवगण फराटा येथे लग्न समारंभात प हल्ला; तरुणाला रॉडने डोक्यात मारहाण, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

9 Star News
0

 मांडवगण फराटा येथे लग्न समारंभात प हल्ला; तरुणाला रॉडने डोक्यात मारहाण, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल



शिरूर,प्रतिनिधी

मांडवगण फराटा येथील पुण्याई मंगल कार्यालयासमोर हाणामारीचा प्रकार घडला असून एका तरुणाला रॉडने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिरूर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      याबाबत ऋषीकेश नितीन जाधव (वय 23, रा. नानगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

       याप्रकरणी संदीप दत्तात्रय शेलार ,हर्षद बाळासो खळदकर, विशाल केशव खळदकर (सर्व रा. नानगाव, ता. दौंड, जि. पुणे)यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे 

13 मे 2025 रोजी दुपारी चारच्या च्या सुमारास ऋषीकेश जाधव हे गावातील आबा गुंड यांच्या मुलीच्या लग्नासाठी पुण्याई मंगल कार्यालयासमोर आले असताना, आरोपींनी ऋषिकेश कडे त रागाने बघत कृष्णा लोंढे याच्या घरी मदत का करतो असे विचारत आक्षेप घेतला. यावेळी संदीप शेलार याने हातातील रॉडने ऋषीकेशच्या डोक्यात मारहाण केली, तर इतर दोघांनी त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी पोटात व छातीवर मारहाण केली. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार खबाले करीत 

आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!