शिरूर प्रतिनिधी
शिरूर बाह्य मार्गावर कोळपे हॉस्पिटल जवळ पुणे अहिल्यानगर महामार्गावर पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून, अपघातानंतर अपघातग्रस्त अज्ञात वाहन चालक वाहनासह पळून गेला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात पहिला दिले दमाई (वय ५० वर्षे रा. बाबुराव नगर शिरूर ता. शिरूर, मूळ रा.कमलबजार नगर जिल्हा अच्छाम नेपाळ) यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत रुपेश टेकबहादुर दमाई (वय 24 वर्ष, रा. बाबुराव नगर ता. शिरूर,जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे ११ मे रात्री साडेनऊ वाजणेचे सुमारास शिरूर बाबुराव नगर कोळपे हॉस्पिटल पासून काही अंतरावर डिव्हायडर जवळ अहिल्यानगर पुणे हायवे वर अहिल्यानगर बाजूकडे जाणारे लेनवर फिर्यादीचे चुलते पहिला दिले दमाई (वय ५० वर्षे रा. बाबुराव नगर शिरूर ता. शिरूर, मूळ रा.कमलबजार नगर जिल्हा अच्छाम नेपाळ) हे पायी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्यांना जोराची धडक देऊन अपघात केला आहे.त्यामध्ये माझे चुलते पहिला दमाई यांचे डोक्याला दोन्ही हाताला पायाला व इतर ठिकाणी व गंभीर स्वरूपाचा मार लागला असून त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला, अपघाता नंतर धडक देणारा वाहन चालक वाहनासह पळून गेला आहे.
याबाबत फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार खेडकर करीत आहे
.