शिरूर येथे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा चालकाला जबर मारहाण.. तिघा विरोधात गुन्हा दाखल

9 Star News
0

 शिरूर येथे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा चालकाला जबर मारहाण.. तिघा विरोधात गुन्हा दाखल 



शिरूर, प्रतिनिधी 

         दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षाचालकाला रस्त्यात अडवून लोखंडी वायर व दगडाने मारहाण करत जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        याबाबत प्रदीप शाही गायकवाड (वय २८, व्यवसाय – रिक्षाचालक, रा. आण्णापूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

           याप्रकरणी जीवन चंद्रकांत सकट, देवा संजय पठारे आणि रोहित दीपक भोंडे (सर्व रा. आण्णापूर, ता. शिरूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक १८ मे २०२५ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास रामलिंग – आण्णापूर रोडवर फिर्यादी त्यांच्या मालकीची रिक्षाने आण्णापूर येथे घरी जात असताना बालाजी शाळेजवळ अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून

जीवन , संजय, व रोहित हे तिघेजण पाठीमागून आले. त्यांनी रिक्षाला एक्टिवा गाडी आडवे करून रिक्षा थांबवली आणि फिर्यादीस “दारू पिण्यासाठी पैसे दे, नाहीतर तुला लय मारू” अशी धमकी दिली. यावेळेस 

फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी l वायर आणि दगडाने फिर्यादीच्या डोक्यावर व पायावर जबर मारहाण केली. शिवीगाळ व दमदाटी करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली असून, तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राऊत करीत आहे

.







टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!