शिरूर बसस्थानकावरून महिलेच्या पर्समधून ८ तोळे सोने पावणेपाच लाखाचे चोरी करणाऱ्या दोन सराईत महिलांना केले जेरबंद

9 Star News
0

 शिरूर बसस्थानकावरून महिलेच्या पर्समधून ८ तोळे सोने पावणेपाच लाखाचे चोरी करणाऱ्या दोन सराईत महिलांना केले जेरबंद ...स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाची संयुक्त कारवाई


शिरूर, प्रतिनिधी

      शिरूर एस टी बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून तब्बल ८ तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी दोन सराईत महिला आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त तपास पथकाने अटक केली असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

        याप्रकरणी मनिषा विजय कसबे, शोभा शंकर दामोदर( रा. संजयनगर श्रीरामपुर ता श्रीरामपुर जि अहिल्यानगर) या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.

         याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक ११ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता बारामती येथील रूपाली अनिल काळे या आपल्या मुलगी तन्वी आणि भाची साक्षीसोबत एसटी बसने प्रवासासाठी शिरूर बसस्थानकावर आल्या होत्या. त्या केडगाव चौफुला – बारामती एसटी बस मध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ६.५ तोळ्यांचे गंठण , १.३ तोळ्यांचे झुबे असा एकूण ₹४ लाख ६८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. एस टी बस स्थानक येथे घडलेल्या गुन्ह्याची गंभीर दखल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी घेऊन यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिस यांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले.

या संयुक्त तपास पथकातील स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पथकाचे पोलीस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजु मोमीन व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, महीला पोलीस अंमलदार मोनिका वाघमारे, पोलीस अमंलदार नितेश थोरात, विजय शिंदे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड, सचिन भोई, निखील रावडे, निरज पिसाळ यांचे तपास पथक तयार केले 

       या तपास पथकाने १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून, तांत्रिक विश्लेषण करून, अखेर श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) येथे राहणाऱ्या मनिषा कसबे आणि शोभा दामोदर या दोन महिला पोलीस तपासात निष्पन्न झाल्या या दोघीही श्रीरामपूर अहिल्यानगर येथील राहणाऱ्या असल्याने. पोलीस पथकाने श्रीरामपूर अहिल्यानगर येथे सापळा रचून

 या दोन महिलांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरी केलेले सर्व ४लाख ६८ हजाराचे सोन्याचे दागिने सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

    ही यशस्वी कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोहे. तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार, तसेच महिला पोलीस भाग्यश्री जाधव, मोनिका वाघमारे, नाथसाहेब जगताप,पोलीस अमंलदार नितेश थोरात, विजय शिंदे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड, सचिन भोई, निखील रावडे, निरज पिसाळ यापथकाने केली आहे.




या पथकाने केली

 आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!