शिरूर पोलीसात शिंदोडी माती चोरी बाबत खोटी फिर्याद दाखल; जय मल्हार क्रांती संघटनेचे दौलतनाना शितोळे यांची सखोल चौकशीची मागणी

9 Star News
0

 शिरूर पोलीसात शिंदोडी माती चोरी बाबत खोटी फिर्याद दाखल; जय मल्हार क्रांती संघटनेचे दौलतनाना शितोळे यांची सखोल चौकशीची मागणी



शिरूर,प्रतिनिधी 

शिरूर पोलीस स्टेशन येथे विनायक लक्ष्मण फडके यांनी दाखल केलेली माती चोरी बाबत फिर्याद ही पूर्णपणे खोटी असून, या खोट्या फिर्यादीमुळे संबंधित व्यक्तीवर अन्याय झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून खोटी फिर्याद देणाऱ्या फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे व शिंदोडी गावचे ग्रामस्थ यांनी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा शिरूर पोलिस स्टेशन येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे इशारा देण्यात आला आहे.

      याबाबतचे निवेदन शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना देण्यात आले आहे.

     यावेळी शिंदोडी सरपंच अरुण खेडकर, जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दादासाहेब पवार, तंटामुक्ती अध्यक्ष इंद्रभान ओव्हाळ, दौलतराव खेडकर गंगाराम माने, मुक्ताजी सरके, गौतम गायकवाड, राजेंद्र खेडकर ,उमाजी माने ,अण्णा माने, उत्तम गायकवाड, मिराबाई ओव्हाळ, तात्याभाऊ ओव्हाळ उपस्थित होते.


      शितोळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर फिर्यादीने जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन पोलिसांना दिशाभूल केली असून, अजित ओव्हाळ नंदू ओव्हाळ, तात्याभाऊ ओव्हाळ,कृष्णाबाई माने, राजेंद्र माने यांच्या विरोधात माती चोरीची फिर्याद दिली आहे. परंतु गट नंबर 223 मधून कोणतीही चोरी झालेली नसताना फिर्यादी यांनी सामान्य गरीब शेतकऱ्यांच्या विरुद्ध खोटी फिर्याद दिलेली आहे. या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती चौकशी करून खोट्या फिर्यादीमागील हेतू उघड करावा व फडके यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.

    याप्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास शिरूर पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दौलतनाना शितोळे व शिंदोडी ग्रामस्थ यांनी दिला आहे. 

        संबंधित जमिनीचा व माती चोरीचा काही संबंध आहे का? याबाबत पाटबंधारे खाते व महसूल खाते यांच्यामार्फत माहिती घेण्यासाठी त्यांना पत्र देण्यात आले आहे. त्यांची माहिती घेऊन कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय होईल असे होणार नाही या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

        संदेश केंजळे, पोलिस निरीक्षक,शिरूर 

       या माती चोरी बाबत अज्ञाता विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस प्रशासन चौकशी करणार आहे. कोणावरही अन्याय होणार नाही. 

     बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार शिरूर

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!