शिरूर तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.६३ टक्के
तालुक्यातील तब्बल १० शाळांचा निकाल शंभर टक्के
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील तब्बल १० शाळांचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून तालुक्याचा निकाल ९५.६३ टक्के लागला आहे.
शिरूर तालुक्यातून ५ हजार ७७९ विदयार्थी बारावी बोर्ड परीक्षेस बसले होते त्यापैकी ५ हजार ५२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ९५.६३ टक्के लागला आहे.
तर विद्याधाम प्रशाला शिरूर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी, स्वातंत्र्य सेनानी कै.शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे, कालिकामाता विद्यालय वाघाळे, श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे, न्यू इंग्लिश स्कूल शिरूर, ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरूर, अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूल शिक्रापूर, कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव, ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज तळेगाव ढमढेरे आदी १० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. अन्य शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे :- चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर (९३.१६), विद्याधाम प्रशाला शिक्रापूर (९६.०१), भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ (८९.५७), आर.बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे (९६.०६), न्यू इंग्लिश स्कूल शिरूर (९७.१९), छत्रपती उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव रासाई (८८.८८), श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे (९९.४४), सरदार रघुनाथ ढवळे विद्यालय केंदूर (८२.३५), बापूसाहेब गावडे ज्यू.कॉलेज टाकळी हाजी (६९.४७), विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी (७४.०७), वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा (९७.२०), श्री भैरवनाथ विद्यालय करडे (५३.३३), विद्याधाम उच्च माध्यमिक विद्यालय कान्हूर मेसाई (९७.१८), श्री दत्त विद्यालय पिंपरखेड (९४.५६), न्यू इंग्लिश स्कूल मलठण (७३.३३), न्यू इंग्लिश स्कूल कवठे यमाई (७६.४७), श्री संभाजीराजे ज्यू.कॉलेज जातेगाव बुद्रुक (९८.९५), श्री छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव भीमा (९७.१४), सौ.हिराबाई गोपाळराव गायकवाड ज्यू.कॉलेज कासारी (९३.५१), विद्यानिकेतन ज्यु. कॉलेज कोंढापुरी (९५.२९), कै.आर.जी. पलांडे माध्य. आश्रमशाळा व ज्यू.कॉलेज मुखई (९९.०५), समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय तळेगाव ढमढेरे (९४.२५), विद्या विकास मंदिर करंदी (९४.८७), एस.पलांडे ज्यू. कॉलेज शिरूर (९५.४५), विजयमाला ज्यू. कॉलेज शिरूर (९८.९५), श्री महागणपती ज्युनिअर कॉलेज रांजणगाव गणपती (९५.७४), ग्लोरी ज्यु.कॉलेज कोरेगाव भीमा (९८.५५), श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा (९७.१४), आदर्श विद्यालय वरुडे (९७.४१), श्री वसंतराव डावखरे मेमोरियल ज्यू.कॉलेज शिरूर (९८.७०), न्यू व्हिजन ज्यू. कॉलेज शिरूर (८३.३३). यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य व शिक्षकांनी अभिनंदन केले.