मांडवगण फराटा येथे लग्न समारंभात हाणामारी तर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल
शिरूर,,
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील पुण्याई मंगल कार्यालयात एका लग्न समारंभात वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन महिलेस असभ्य वर्तन करत तिची विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिलेने (वय 22, रा. नानगाव, ता. दौंड) फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी संदीप उर्फ गुलाब पोपट खळदकर, विक्रांत उर्फ विकास खळदकर, महेश इंगळे, अभिजित खळदकर, शिवाजी खळदकर, ऋषिकेश जाधव, निखील निगडे, शेखर खळदकर, सुशांत खळदकर, अनिकेत इंगळे (सर्व रा. नानगाव, ता. दौंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला व त्यांचे पती संदीप शेलार हे आपल्या गावातील आबा गुंड यांच्या मुलीच्या लग्नासाठी मांडवगण फराटा येथे आले असता, दहा आरोपींनी त्यांना उद्देशून शिवीगाळ करत अचानक हल्ला केला.
फिर्यादीच्या पतीला "केडगाव चौकीत तक्रार का केलीस?" असे विचारून हाताने व दगडाने मारहाण करण्यात आली. त्याच दरम्यान आरोपी संदीप उर्फ गुलाब खळदकर याने फिर्यादीच्या तोंडावर मारून, ओढणी खेचून विनयभंग लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादीवरून शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार खबाले करीत
आहे.