शिरूर तालुक्यात धरणाच्या बॅकवॉटरमध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून तपास सुरू
शिरूर, प्रतिनिधी
चिंचणी (ता. शिरूर) येथील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ४० ते ४५ वर्षाच्या एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत बाळासाहेब जगन कचरे (वय 45, रा. चिंचणी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी खबर दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे
बाळासाहेब कचरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गावातील अनिल माणिक पवार यांनी फोन करून बॅकवॉटरमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती दिली. ते घटनास्थळी पोहोचल्यावर पाण्यात तरंगत असलेला मृतदेह त्यांच्या निदर्शनास आला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून त्वचा सडलेली आणि जलचर प्राण्यांनी कुरतडलेली आहे. त्यामुळे मृतदेह ओळखण्यास अडचण येत आहे.
शिरूर पोलीस स्टेशन येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार टेंगले करीत आहे.