करंदीत तिरंगा रॅलीतून देशसेवेप्रती कृतज्ञता
बालरंगभूमी परिषदेतर्फे तिरंगा रॅलीचे काढत जवानांना पाठींबा
शिरूर
( प्रतिनिधी ) करंदी ता. शिरूर येथे बालरंगभूमी परिषदेच्या वतीने देशसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करत भारतीय जवानांना पाठिंबा देण्यासाठी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन हातामध्ये तिरंगा घेऊन रॅलीच्या माध्यमातून जय जवान - जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम या देशभक्तिपर घोषवाक्यांचा जयघोष करण्यात आला.
करंदी ता. शिरुर येथे बालरंगभूमी परिषदेच्या वतीने आयोजित तिरंगा रॅली दरम्यान बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा दिपाली शेळके, नंदा ढेरे, उपसरपंच नितिन ढोकले, पोलीस पाटील वंदना साबळे, शिक्रापूरचे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे, प्रवीण ढोकले, किसान करिअर अकॅडमीचे संजय तांबे, भूषण घोलप, युवा सेनेचे वैभव ढोकले, संतोष दरेकर, मोहन घोलप, बाबुराव चौधरी, बंटी ढोकले, बाळासाहेब ढोकले, सोमनाथ कदम, संतोष खेडकर, गणेश मानकर, राजेंद्र दरेकर, बाबासाहेब दरेकर, पोपट नप्ते, अविनाश साकोरे यांसह शाळेतील बालक व नागरिकांनी सहभाग घेतला. सदर रॅलीदरम्यान जय जवान – जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम या देशभक्तिपर घोषवाक्यांनी संपूर्ण दुमदुमून गेला. दरम्यान कोल्हापूर येथे कला संस्कार शिबिरामध्ये सहभागी मुलांना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, तर यावेळी बोलताना अशा उपक्रमांद्वारे बालकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे उद्दिष्ट असल्याचे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा दिपाली शेळके यांनी सांगितले तर युवा सेनेचे संघटक वैभव ढोकले यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ – करंदी ता. शिरुर येथे भारतीय जवानांना पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आलेली तिरंगा रॅली.