रस्त्याच्या मधोमध पोलला एस टी बसची धडक...शिरूर नगरपरिषदेने रस्ता दुभाजक काढल्यानेच अपघात! नगरपरिषदेचा भोंगळ आणि गलथान कारभार..

9 Star News
0

 रस्त्याच्या मधोमध पोलला एस टी बसची धडक...शिरूर नगरपरिषदेने रस्ता दुभाजक काढल्यानेच अपघात! नगरपरिषदेचा भोंगळ आणि गलथान कारभार..


शिरूर दिनांक प्रतिनिधी

शिरूर तहसील कार्यालयासमोरील अंतर्गत रस्त्यावर रात्री एसटी बसणे विद्युत कामांना देऊन अपघात झाला असून यात नगरपालिकेची मोठी नुकसान झाले आहे. जरी नगरपालिकेचे मोठे नुकसान झाले असले तरी हा अपघात म्हणजे शिरूर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या भोंगळ व गलथान कारभार कारणीभूत आहे.

        हा अपघात काल १४ मे संध्याकाळी १० च्या सुमारास झाला. शिरुर डेपोची तुळजापूर शिरुर ही एस . टी बस( एमएच ४० वाय ५८२८ )शिरुर शहरातून जात असणा-या पुणे अहिल्यानगर मार्गावरुन शिरुरकडे जात असताना शिरुर तहसिल कार्यालया समोर रस्त्याच्या मध्यभागी असणारा वीजेचा खांबास बसने जोरदार धड्क दिली . धडके नंतर मोठा आवाज झाला व वीजेचा खांब रस्त्यात आडवा झाला

      शिरूर शहरात शिरूर नगर परिषदेचे वतीने शहराच्या मध्यभागी विद्युत पोल लावण्यात आले आहे. परंतु हे पोल लावत असताना याठिकाणी असणारे एक फूट उंचीचे रस्ता दुभाजक शिरूर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने का काढले आहे हा संशोधनाचा विषय आहे. हे रस्ता दुभाजक काढल्यामुळे शिरूर तहसील कार्यालय ते पूल असे दोनशे फूट अंतरावरील दुभाजक निघाल्यामुळे यारस्त्यावर अचानक कुणी वाहन चालक चारचाकी असो वा दुचाकी असो कसाही वळवत असतो. त्यात शिरूर तहसील कार्यालय बाहेरून हा दुभाजक काढल्यामुळे नगर बाजूकडून येणारे वाहन चालक जर नवीन असेल तर अचानक रस्त्याचा मधोमध विद्युत पोल दिसत नाही. आणि अंधारातून अचानक अंधुक प्रकाश यामुळे असे अपघात होत आहे.

      शिरूर नगरपरिषदेने या ठिकाणी असलेले रस्ता दुभाजक का व कोणासाठी काढली हा संशोधनाचा विषय असून या ठिकाणी नगर परिषदेने तात्काळ रस्ता दुभाजक बांधावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. काय एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी व्हावी अशी नगर परिषदेची इच्छा तर नाही ना असेच म्हणावे लागेल

"हा अपघात की नगरपरिषदेच्या गलथान कारभाराचा शाप?"


शहरातील नागरिकांची मागणी स्पष्ट आहे – या ठिकाणी तातडीने दुभाजक पुन्हा उभारावेत आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा उद्या याच ठिकाणी एखाद्याचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण?

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!