बुरुंजवाडीत बिबट्याच्या तीन बछड्यांचे पुनर्मिलन बिबट मादीने हलविले बछड्यांना सुरक्षितस्थळी, घटना ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

9 Star News
0

 बुरुंजवाडीत बिबट्याच्या तीन बछड्यांचे पुनर्मिलन


बिबट मादीने हलविले बछड्यांना सुरक्षितस्थळी, घटना ट्रॅप कॅमेऱ्यात कैद



शिरूर 

( प्रतिनिधी ) बुरुंजवाडी ता. शिरुर येथे उसतोड सुरु असताना तीन बिबट्याचे बछडे आढळून आले असताना या बिबट्याच्या बछड्यांना वनविभाग व प्राणी मित्रांच्या मदतीने पुन्हा त्याच्या आईच्या स्वाधीन करण्याचे प्रयत्न केले असता अखेर बिबट्याच्या बछड्यांचे व आईचे पुनर्मिलन झाले असून याबाबतचा सर्व प्रकार वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


                          बुरुंजवाडी ता. शिरुर येथील यशवंत नळकांडे यांच्या शेतात उसतोड सुरु असताना बिबट्याचे तीन बछडे दिसून आले होते, यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी भानुदास शिंदे, नियतक्षेत्र अधिकारी वंदना चव्हाण, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व वनविभाग रेस्क्यू टीम मेंबर शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी सदर तीन बछड्यांना ताब्यात घेत त्या बछड्यांचे त्यांच्या आईशी पुनर्मिलन करण्याचा प्रयत्न करत तीनही बछड्यांना सुरक्षितपणे ठेवत तेथे ट्रॅप कॅमेरा लावून ठेवला असता रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या मादीने तीन वेळा बछडे ठेवलेल्या ठिकाणी येत तिच्या तीनही बछड्यांना सुरक्षितपणे सदर ठिकाणहून सुरक्षितस्थळी नेले असल्याचे वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे, तर बिबट्याच्या आई पासून दुरावलेल्या बछड्यांचे पुनर्मिलन झाल्याने वनविभाग व प्राणीमित्र व नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.


स्वतंत्र चौकट १ –


स्थानिकांचे सहकार्य गरजेचे – निळकंठ गव्हाणे ( वनपरिक्षेत्र अधिकारी )


शेतामध्ये जाम करताना कोठे बिबट्याची पिल्ले आढळून आल्यानंतर त्या पिल्लांचे त्यांच्या आईशी पुनर्मिलन करणे गरजेचे असते अन्यथा बिबट मादी अती घातकी होते, वनविभाग व त्यांच्याशी संलग्न असलेली टीम त्या पद्धतीने काम करत असते मात्र तेथील स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहकार्य करणे गरजेचे असल्याचे शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.


स्वतंत्र चौकट २ –


चार महिन्यात १५ बिबट बछडे, ५ कोल्हे व एका माकडाचे पुनर्मिलन . .


शिक्रापूर सह परिसरामध्ये चार महिन्यात तब्बल १५ बिबट्यांचे बछडे, ५ कोल्ह्याची पिल्ले तसेच एका माकडाच्या पिल्लाचे त्यांच्या आईशी वनविभागाच्या मदतीने पुनर्मिलन करण्यात यश आले असल्याचे निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व रेस्क्यू टीम मेंबर शेरखान शेख यांनी सांगितले.  


फोटो खालील ओळ – बुरुंजवाडी ता. शिरुर येथील बिबट्याच्या घेऊन जाताना तीन वेळा ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेली बिबट मादी.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!