शिरूरमध्ये नगरपरिषदेची शववाहिनी बंद नागरिकांमध्ये तीव्र नाराजी..

9 Star News
0

 शिरूरमध्ये नगरपरिषदेची शववाहिनी बंद नागरिकांमध्ये तीव्र नाराजी..



शिरूर, प्रतिनिधी 

          शिरूर नगरपरिषद क्षेत्रात असलेली शववाहिनी सध्या बंद अवस्थेत असून त्यामुळे नागरिकांना मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही शेव वाहिनी एका अडगळीच्या ठिकाणी धूळ खात पडली असून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शोधून काढून शिरूर नगर परिषदेचा भोंगळ कारभार समोर आणला आहे.

       सदर शववाहिनी ही आमदार अनिल भोसले यांच्या निधीतून प्राप्त झाली होती. मात्र, सध्या ती पूर्णपणे निकामी झाली असून, नागरीकांची गैरसोय वाढली आहे. अंत्यसंस्कारासाठी इतर खाजगी वाहनांचा वापर करावा लागत असून त्याचा आर्थिक व भावनिक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर अनेक ॲम्बुलन्स शव नेण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

     या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विजय नरके,प्रितेश फुलडाळे आणि राजेंद्र महाजन (शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे) यांनी शिरूर नगर परिषदेच्या एका गोडाऊनमध्ये ही शव वाहिनी धूळ खात पडल्याचे शोधून काढून नागरिकांच्या लक्षात आणून दिले आहे. ही शव वाहिनी दुरुस्त केली तर पुन्हा एकदा नागरिकांच्या सेवेस हजर होईल यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी

 नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी मागणी केली आहे की, सदर शववाहिनीची दुरुस्ती करून ती लवकरात लवकर जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी.

"जनतेच्या मूलभूत गरजांकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे. शववाहिनी ही कोणत्याही नगरपरिषदेसाठी अत्यावश्यक सेवा आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत," अशी प्रतिक्रिया दिली आहे.

विजय नरके सामाजिक कार्य

कर्ते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!