जांबुत येथे घरात घुसून महिलेला लुटले; कान फाडून सोनं ओढलं
जांबुत (शिरूर) | प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील जांबुत येथील थोरात वस्तीवर दोन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून एका महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील व कानातील दागिने जबरदस्तीने ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत महिलेला डाव्या कानाच्या पाळीला गंभीर दुखापत झाली आहे.
ही घटना मंगळवारी (दि. 29 एप्रिल) पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे फिर्यादी हिराबाई लक्ष्मण थोरात (वय ५२, रा. जांबुत, थोरात वस्ती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या पहाटेच्या सुमारास घरात झोपलेल्या असताना दोन अज्ञात इसमांनी खिडकी उचकटून घरात प्रवेश केला. त्यातील एकाने त्यांच्या गळ्यातील डोरले हिसकावून घेतले, तर दुसऱ्याने त्यांच्या दोन्ही कानातील सोन्याच्या कुड्या जबरदस्तीने काढून नेल्या. डाव्या कानातील कुडी निघत नसल्याने ती ओढताना त्यांच्या कानाला गंभीर जखम झाली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 309(4), 331(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आ
हेत.