शिरूर येथे व्यावसायिकाची १५ लाखांची फसवणूक; शिरूर पोलीस ठाण्यात पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर येथील व्यावसायिक यांची १५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात दाखल केली असून, याप्रकरणी पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजेंद्र अशोक बारगुजे (वय 49 वर्षे, रा. बाबुराव नगर शिरूर ता. शिरूर)यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी दीपक भिमराव बारवकर, सारिका दीपक बारवकर (दोघे रा. ओयासीस सोसायटी रामलिंग रोड शिरूर ता. शिरूर ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती पुढील प्रमाणे
फिर्यादी राजेंद्र बारगुंजे (वय ४९, रा. बाबुराव नगर, शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे ओळखीचे दिपक बारवकर व सारिका पती पत्नी यांनी त्यांना एका ट्रक लोनच्या पेमेंटसाठी मध्यस्थी करण्यास सांगितले होते. बारगुजे यांची पायाल सर्विस सेंटर या फर्म वरती चोला मंडल फायनान्सकडून आलेले १५ लाख रुपये जमा झाले हे पेमेंट बारगुजे यांनी बारवकर पती पत्नी यांच्या वेदांत मोटर्सच्या खात्यावर जमा केले.परंतु हे पैसे ट्रकचे मालक मिनीनाथ बाळू इरोळे व गाडी घेणार किसन जयवंत नरवडे यांना न देता बारवकर आणि त्यांच्या पत्नी सारिका बारवकर यांनी स्वतःसाठी वापरले, असा आरोप बारगुजे यांनी केला आहे.
याप्रकरणी तक्रारदार बारगुजे यांनी दिलेले peसांगितले की, वारंवार पैशांची मागणी करूनही त्यांना पैसे परत मिळाले नाहीत, उलट त्यांना उडवाउडवीची उत्तरे आणि शिवीगाळ करण्यात आली. इतकेच नव्हे, तर आरोपी दिपक बारवकर यांनी त्यांना सावकारीच्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याची धमकी देखील दिली आहे.
बारवकर दांपत्याने त्यांच्या वेदांत मोटर्स या फर्मच्या खात्यावर एकूण १५ लाख रुपये घेतले असून, पैसे परत मागितल्यास शिवीगाळ व धमकी देत विश्वासघात करून फसवणूक केली त्यानंतर शंभर रुपयांच्यास्टँप वर नोटरी करून पैसे देतो म्हणून बारवकर पती पत्नी यांनी सांगितले. परंतु अद्याप पैसे दिले नाही
फिर्याद दाखल केली असून, शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.