हिंदू देवांवर टिका, धर्मांतराचा दबाव!उचाळेवस्तीतील गायकवाड कुटुंबावर ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी दबाव सात जणांवर गुन्हा दाखल

9 Star News
0

 हिंदू देवांवर टिका, धर्मांतराचा दबाव!उचाळेवस्तीतील गायकवाड कुटुंबावर ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी दबाव सात जणांवर गुन्हा दाखल 


शिरूर( प्रतिनिधी): 

        उचाळेवस्ती टाकळीहाजी ता.शिरूर येथे तुमच्या देवांनी काय केलं? तुमच्या देवांमुळे काही फायदा झाला का?" असे म्हणत घरातील काळुबाई व स्वामी नरेंद्र महाराज यांच्या प्रतिमांकडे हात करत हिंदू देवता बद्दल अपशब्द व अपमानास्पद भाष्य केले गेले. "तुम्हाला चर्चमध्ये आल्यावर सर्व आजार बरे होतील," असा प्रचार करत "तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारलात, तर आर्थिक मदत करू," असेही आमिष दिल्याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशन येथे सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हिंदू धर्मावरील अशा योजनाबद्ध हल्ल्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरात जोर धरू लागली आहे.

      याबाबत शेतकरी राहुल मारुती गायकवाड (वय ३९, रा. उचाळेवस्ती, टाकळीहाजी, ता. शिरूर) यांनी फिर्यादी दिली आहे.

      प्रशांत जालिंधर घोडे (रा.उचाळेवस्ती टाकळी हाजी ता. शिरूर जि. पुणे),मोजस बार्बनबस डेव्हिड (वय.४८ वर्षे रा.२०४ लिव्ह गॅलक्शी, गोकुळ सो. डोरेबाळा रोड नागपुर ता. जि. नागपुर ),अमोल विठ्ठलराव गायकवाड( वय. ४२ वर्षे, रा. प्लॉट नं. १४६९, आयुषी अपार्टमेंट, न्यु नंदनवन नागपुर ता. जि. नागपुर ), योगेश संभुवेल रक्षंत (वय. ३७ वर्षे, रा.६/१७, रामबाग कॉलनी, मेडीकल चौक नागपुर ता. जि. नागपुर ) ,जेसी अॅलीस्टर अॅन्थोनी (वय.२२ वर्षे, रा.२०२ गणराज फोर रेसिडेन्सी सचिन ले आउटझिंगावाईन टाकळी नागपुर ता. जि. नागपुर), कुणाल जितेश भावणे (वय. ३२ वर्षे, रा. बाजारचौक, आंधळगाव ता. मोहोळ जि. भंडारा) सिध्दांत सदार कांबळे (वय. ३० वर्षे रा. रेड्डी इन क्लब मुंढवा केशवनगर, हनुमान नगर पुणे).

       याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे

१ मे २५ रोजी सायंकाळी सात सुमारास ते आपल्या कुटुंबासोबत घरासमोर बसले होते. यावेळी प्रशांत जालिंदर घोडे व त्याच्यासोबत सहा अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. "तुम्ही कोणत्या धर्माचे?" अशी विचित्र चौकशी करत, "बायबल वाचा, चर्चमध्ये या, तुमच्यावर प्रभु येशूची कृपा होईल," असे सांगत धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकला."तुमच्या देवांनी काय केलं?" असा सवाल करत सात जणांचा टोळकाच उचाळेवस्ती येथील गायकवाड कुटुंबाच्या दारात येऊन बसला! "प्रभु येशूला मान्य करा, चर्चमध्ये या, आर्थिक फायदा होईल," असे आमिष दाखवत हिंदू धर्म त्याग करण्यासाठी जबरदस्ती सुरू झाली! मात्र फिर्यादी गायकवाड कुटुंबाने ठाम भूमिका घेत "आम्ही हिंदू आहोत आणि राहणारच!" असा स्पष्ट नकार दिला. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

इतकेच नव्हे तर, "तुमच्या देवांनी काय केलं? तुमच्या देवांमुळे काही फायदा झाला का?" असे म्हणत घरातील काळुबाई व स्वामी नरेंद्र महाराज यांच्या प्रतिमांकडे हात करत अपमानास्पद भाष्य केले गेले. "तुम्हाला चर्चमध्ये आल्यावर सर्व आजार बरे होतील," असा प्रचार करत "तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारलात, तर आर्थिक मदत करू," असेही आमिष देण्यात आले.

       या प्रकारामुळे गायकवाड कुटुंब हादरून गेले असून त्यांनी तत्काळ डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन टाकळी चौकीत आणले. चौकशीत खालील सात ही आरोपींची नावे निष्पन्न झाली असून,

या टोळीने धार्मिक भावना दुखावणे, अमिष देणे, जबरदस्तीने धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करणे, असा कट रचल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाल्याने सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बजरंग दलाचे आवाहन असे कुठल्याही प्रकारे धर्मांतरण होत असल्याचे अढळल्यास स्थानिक बजरंग दलाशी संपर्क साधा असे आवाहन बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!