पिंपरी पुणे येथे होलार समाज संस्थेच्यावतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून, विशेषतः महिलांमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. याच पार्श्वभूमीवर होलार समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० या वेळेत ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे, पिंपरी, पुणे येथे पार पडणार आहे.
या शिबिरा डॉ. प्रकाश जावीर (एम.बी.बी.एस.),डॉ. सचिनकुमार ऐवळे (आर्थो सर्जन),डॉ. (सौ.) सीमा ऐवळे (स्त्रीरोग तज्ज्ञ) या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
शिबिरात होणाऱ्या मोफत तपासण्या:
मणक्याचे विकार, गॅप, कंबरदुखी, मानदुखी,ऑर्थोपेडिक समस्या व हाडांची घनता तपासणी (BMD),संधिवात, आमवात, स्नायू विकार, चालण्याच्या पद्धतीचे मूल्यांकन,मासिक पाळीतील त्रास, PCOS, रजोनिवृत्तीनंतरचे मार्गदर्शन,प्रजनन व स्त्री आरोग्याविषयी सल्ला.
या शिबिरातून महिलांना विविध आरोग्य समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला मिळणार असून, सर्व समाजबांधव व भगिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
दत्तात्रय पारसे – ९५९५७९३८१७
श्रीनिवास जावीर – ९००४६५६८८०
दिलिप गुळीग –
८८१३१५६३०
.