शिरूर येथील एका चहावाल्याच्या मुलगा अशोक लांडे याने चहा टपरीवर वडिलांना मदत करत.... दहावी बोर्डाच्या परीक्षेत मिळवले 95.40 टक्के गुण.. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी अशोक..

9 Star News
0

शिरूर येथील एका चहावाल्याच्या मुलगा अशोक लांडे याने चहा टपरीवर वडिलांना मदत करत.... दहावी बोर्डाच्या परीक्षेत मिळवले 95.40 टक्के गुण.. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी अशोक...


शिरूर, प्रतिनिधी 

        जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर यश मिळवता येतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे अशोक गजानन लांडे. शिरूर शहरात आपल्या वडिलांच्या छोट्याशा चहाच्या टपरीवर काम करत करत त्याने शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली आणि आज तो १० वीच्या परीक्षेत ९५.४० टक्के गुण मिळवून संपूर्ण शहराचा अभिमान ठरला आहे.

      अशोकचे वडील गजानन लांडे शिरूरमधील पुणे जिल्हा बँकेसमोर चहाचे गाडी चालवतात तर आई उषा या गृहणी आहेत, भाऊ दीपक हा सेकंड इयर ला शिकत आहे. 

        लांडे कुटुंबाची घराची आर्थिक स्थिती नाजूक, त्यांनी मुलाच्या शिक्षणाला अडथळा येऊ दिला नाही. अशोक व दीपक दोघे भाऊ देखील सकाळी, संध्याकाळी लवकर उठून वडिलांना टपरीवर मदत करत असे, त्यानंतर शाळा आणि संध्याकाळी पुन्हा दुकानावर काम. या सगळ्या कष्टांच्या आणि वेळेच्या अभावातही त्याने अभ्यास सोडला नाही. ऐन परीक्षा तोंडावर असताना डिसेंबर जानेवारी मध्ये त्याचे वडील गजानन यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांना बायपास सर्जरी करावी लागली. याच वेळेस घरावर आर्थिक ताण आला. तर वडीलांचे ऑपरेशन या दोन्हीची टेन्शन असतानाही अशोक याने चहा टपरीवर भावासह काम करून जिद्द आणि चिकाटीने अभ्यास सोडला नाही.

      शिक्षकांचे मार्गदर्शन, स्वतःची मेहनत आणि अभ्यासावर असलेली निस्सीम निष्ठा या जोरावर अशोकने दहावीमध्ये उज्वल यश मिळवलं. केवळ आपल्या लांडे कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गावाचे नाव त्याने उज्वल केलं.

     त्याचे शालेय शिक्षण नगरपरिषद शाळा क्रमांक पाचवी नंतर विद्याधाम प्रशाला येथे झाले आहे.

      त्याच्या या यशाबद्दल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभागीय कार्यालयात त्याचा सत्कार करण्यात आला. बँकेच्या वतीने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

         अशोकची ही यशोगाथा आज अनेक गरिब, पण मेहनती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे.

       अशोकचे वडील गजाजन लांडे यांना मुलाच्या यशाबद्दल आनंद झाला आहे. तर डोळेही पाणावले... मुलांनी मोठे होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे ही इच्छा त्यांनी बोलून दाखवली.

      ऐन परीक्षेच्या काळात वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची बायपास झाली यावेळी चहाच्या गाडीवर आम्ही दोघा भावांनी काम करता करता मी अभ्यासही केला आणि त्याची फळ मिळाले. पुढे इंजिनीयर होण्याचे स्वप्न ही त्याने पाहिले आहे. 

      अशोक लांडे दहावी बोर्डाच्या परीक्षेत 95.40टक्के मार्क.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!