शिरुरमध्ये विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
शिरूर
( प्रतिनिधी ) सध्या राज्यभरात महिलांचे पैशासाठी छळ, हुंडाबळीच्या अनेक घटना समोर येत असताना शिरुर शहरात देखी;ल विवाहितेच्या छळ प्रकरणी
सासू सासरे पती जाऊ दीर या पाच जणांन विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पती अनिल सुरेश सालके, सासू शैलाबाई सुरेश सालके, सासरे सुरेश दगडू सालके, जाऊ रेश्मा गणेश सालके, दीर गणेश सुरेश सालके या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे शिरुर शहरातील बाबुराव नगर मध्ये राहणाऱ्या मोहिनी उर्फ रेश्मा या महिलेच्या लग्नानंतर महिलेला सुरवातीला व्यवस्थित वागणूक देऊन नंतर माहेरहून पैसे आन असे म्हणून विवाहितेला उपाशी ठेवत, शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली
तर विवाहितेला लग्नात दिलेले अकरा तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले व तिच्या वडिलांकडून दोनलाख रूपये तिचे सासरे यांनी घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत विवाहितेने रा. बाबुरावनगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी अनिल सुरेश सालके, शैलाबाई सुरेश सालके, सुरेश दगडू सालके, रेश्मा गणेश सालके, गणेश सुरेश सालके सर्व रा. जवळा ता. पारनेर जि. आहील्यानगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार उमेश भगत हे क
रत आहे.