मांडवगण फराटा येथे १० वीत शिकणाऱ्या अनुष्का फराटेने दाखवले धाडस – ओढ्यात पडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला

9 Star News
0


मांडवगण फराटा येथे १० वीत शिकणाऱ्या अनुष्का फराटेने दाखवले धाडस – ओढ्यात पडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला!

शिरूर प्रतिनिधी 

मांडवगण फराटे, ता. शिरूर – अवघ्या १० वीमध्ये शिकणारी अनुष्का धनंजय फराटे हिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचवून धाडसाचे उदाहरण घालून दिले आहे. ही घटना मांडवगण फराटे ते कोळगाव डोळस रस्त्यावर, एका ओढ्यावर घडली.

. मुसळधार पावसामुळे मांडवगण फराटा ते कोळगाव डोळस रस्त्यावरील ओढ्याला पूर आला होता. गोपीनाथ बापूराव शेलार हे आपल्या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना या ओढ्यावरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि ते थेट खोल पाण्यात पडले. मोटारसायकलही ओढ्याच्या पाण्यात वाहून जाण्याच्या अवस्थेत होती.त्याच वेळी अनुष्का धनंजय फराटे ही मुलगी क्लासवरून घरी परतत होती. ही धोकादायक घटना तिच्या नजरेस पडताच, कोणतीही भीती न बाळगता आणि वेळ न दवडता तिने तत्काळ मदतीस धाव घेतली. अनुष्काने शेलार यांना मोटारसायकलला घट्ट पकडून ठेवण्यास सांगितले आणि स्वतः त्यांच्या जवळ जाऊन त्यांना मोटारसायकलसह पाण्यातून बाहेर ओढले. आणि त्याचा जीव वाचवला.

 १०वीत शिकणाऱ्या मुलीकडून अशा प्रकारचे शौर्य आणि प्रसंगावधान दाखवणे समाजासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

अनुष्काच्या धाडसाचे शिरूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून,ग्रामस्थांनी तिच्या धाडसाची प्रशंसा केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!