शिरूर न्हावरे येथे बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश ८ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - पुणे कृषी विभागाची कारवाई

9 Star News
0

 शिरूरमध्ये बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश ८ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - पुणे कृषी विभागाची कारवाई 



शिरूर, प्रतिनिधी 

          पुणे जिल्ह्यातील न्हावरे ता.शिरूर येथे बनावट रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पुणे कृषी विभागाने छापा टाकत पर्दाफाश केला असून, विनापरवाना अमोनियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट या खतांचे बेकायदेशीर उत्पादन आणि साठा करत असताना दोघांना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत सुमारे ८ लाख ७८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

     याप्रकरणी पुणेजिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय दिनकर पाटील (वय 53) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली 

     याप्रकरणी संतोष दिनकर वेताळ आणि महेंद्र गणपत शेलार, (दोघेही रा. न्हावरा, ता. शिरूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २७ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास, न्हावरा ते गुणाट रोडवरील गट नंबर ३१३ मध्ये काही व्यक्ती बेकायदेशीरपणे रासायनिक खतांची निर्मिती करत असल्याची गोपनीय माहिती पुणे कृषी विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे पुणे कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय पाटील ,शिरूर पंचायत समिती खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी दिनेश अडसुळ, कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ, तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) डॉ .प्रवीण कदम या पथकाने तातडीने त्याठिकाणी छापा टाकला तिथे अमोनियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट या खतांच्या उत्पादनाचा किंवा साठवणुकीचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना फसवणूक करुन बनावट खत निर्मिती करताना पकडण्यात आले आहे.परवान्यामध्ये मंजुर नसलेल्या व इतर अन्य कंपनींचे खताचे उत्पादन करून पिशव्यामध्ये भरत असल्याचे दिसुन आले. घटनास्थळावरून अमोनियम सल्फेटच्या ९१७ बॅग, तसेच मॅग्नेशियम सल्फेटच्या ११ बॅगा असा एकूण ८ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या छाप्यात संतोष दिनकर वेताळ आणि महेंद्र गणपत शेलार, दोघेही रा. न्हावरा, ता. शिरूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे . आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 318(4)3(5), रासायनिक खते नियंत्रण आदेश 1985 च्या विविध कलमांखाली (12, 21, 7, 19(c), 28, 35(1)) आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3(2)(d), 7, 8, 10 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक श्रीशैल  चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!