शिरूर करडे एमआयडीसीतून शासकीय जागेतून १९ लाख ८० हजार रुपयांचा मुरुम तस्करांनी चोरून नेला

9 Star News
0

 शिरूर करडे एमआयडीसीतून शासकीय जागेतून १९ लाख ८० हजार रुपयांचा मुरुम तस्करांनी चोरून नेला


शिरूर प्रतिनिधी 

       शिरूर तालुक्यातील करडे एमआयडीसी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीच्या जमिनीतून तब्बल १९ लाख ८० हजार रुपये किमतीचा ३३०० ब्रास मुरुम अनधिकृतपणे उत्खनन करून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

       शिरूर तालुक्यात आता माती चोरांबरोबर मुरूम चोरांनी हैदोस घातला असून, आता शासकीय जमिनीवरील मुरमावर डल्ला मारून पोलिस व महसूल प्रशासनाला आव्हान दिले आहे.

          याबाबत एमआयडीसी अधिकारी मिलिंद रामचंद्र कासार (वय 56 वर्ष रा. मीतिला नगरी पिंपळे सौदागर पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

         शिरूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आ

         याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक 16 मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास करडे एमआयडीसी येथे फिर्यादी आले असता त्यावेळी त्यांनी दोन पंच समक्ष कर्डे तालुका शिरूर गावचे हद्दीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करडे तालुका शिरूर यांचे नावे असलेले जमीन गट नंबर 115 /अ /ब/६ क्षेत्र अशा एकूण क्षेत्रातून ३३०० ब्रास मुरूम एकूण किंमत १० लाख ८० हजाराचा जेसीबी व ट्रकच्या(डंपर) साह्याने चोरून नेला आहे. याबाबत निमोणे मंडल अधिकारी यांनी याबाबत पंचनामा केला आहे.

       फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस हवालदार भोते करीत आहेत.

चौकट 

      सध्या शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात माती चोरांनी हैदोत घातला आहे. त्यात आता शासकीय सार्वजनिक मालमत्तेतून मोठ्या प्रमाणावर मुरुमाची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यावर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन काय कारवाई करणार कडे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!